‘त्या’ ९४ शाळा बंद करण्यास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 10:16 PM2020-05-13T22:16:21+5:302020-05-14T00:49:12+5:30

औंदाणे : राज्यातील दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करून विद्यार्थ्यांचे नजीकच्या शाळेत समायोजन करण्याचे शासनाने धोरण आखले आहे. राज्यातील सुमारे ४६९० शाळा बंद होणार असल्याची भूमिका शासनाने घेतली आहे.

Opposition to closure of 'those' 94 schools | ‘त्या’ ९४ शाळा बंद करण्यास विरोध

‘त्या’ ९४ शाळा बंद करण्यास विरोध

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
औंदाणे : राज्यातील दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करून विद्यार्थ्यांचे नजीकच्या शाळेत समायोजन करण्याचे शासनाने धोरण आखले आहे. राज्यातील सुमारे ४६९० शाळा बंद होणार असल्याची भूमिका शासनाने घेतली आहे. त्यात नाशिक जिल्ह्यातील ९४ शाळांचा सहभाग आहे. मात्र या शाळांचे
शासनाने २०१७-१८ मध्ये सर्वेक्षण केल्यानंतर दोन वर्षांत या शाळांचा पट वाढला असल्याने शाळा बंद
करण्यास शिक्षक संघाने विरोध दर्शविला आहे.
शासनाने या शाळा बंद करू नयेत, अशी मागणी नाशिक जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष आर.के. खैरनार यांनी केली आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार दहापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करून विद्यार्थ्यांचे नजीकच्या शाळेत समायोजन केले जाईल,
अशी शासनाची भूमिका असल्याने या विद्यार्थ्यांना नजीकच्या शाळेत ये-जा करण्यासाठी प्रवास भत्ता देण्यात येईल, अशी चर्चा शासन स्तरावर झालेली आहे.
नाशिक जिल्ह्यात ९४ शाळांचा यादीत समावेश असून, २०१७-१८ मध्ये दोन वर्षांपूर्वी शासनाने या शाळांचे सर्वेक्षण केले असता पटसंख्याकमी असली तरी दोन वर्षानंतर ग्रामस्थांचा पुढाकार व अधिकारी, शिक्षक यांच्या प्रयत्नांमुळे या शाळांचा पट वाढला आहे. या शाळा सध्या सुरू आहेत व गुणवत्ता विकासात अग्रेसर
आहेत. परिणामी शैक्षणिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे शासनाने या शाळांचा पटसंख्या वाढविण्यावर भर देऊन पाठपुरावा करून शाळा बंद करू नयेत, अशी मागणी शिक्षक संघाने केली आहे.
-------------------
शासनाच्या निर्णयाने नाशिक जिल्ह्यात चिंतेचे वातावरण आहे. या कमी पटसंख्येच्या शाळा बहुतांश दुर्गम भागात आहेत. बंद पडलेल्या शाळाही अन्य ठिकाणी सुरू केलेल्या आहेत. मात्र आदिवासी पाड्यावरील शाळांमध्ये रस्ते, वाहनांची व्यवस्था, पावसाळ्यात नदी नाले यांना पूर आल्यास गावाचा संपर्क तुटतो. गावात शाळा नसल्यास विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील व शैक्षणिक नुकसान होईल. त्यामुळे शासनाने अशा शाळा बंद करू नयेत.
- आर. के. खैरनार, जिल्हाध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संघ

Web Title: Opposition to closure of 'those' 94 schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक