विद्यापीठ विभाजनास आमदारांचा विरोध

By Admin | Published: January 31, 2016 11:29 PM2016-01-31T23:29:03+5:302016-01-31T23:30:28+5:30

मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा : आरोग्य विद्यापीठ दुबळे करण्याचा प्रयत्न हाणून पाडण्याचा सूर

Opposition to the division of the university | विद्यापीठ विभाजनास आमदारांचा विरोध

विद्यापीठ विभाजनास आमदारांचा विरोध

googlenewsNext

नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विभाजनाचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर शहरातील आमदार आणि विद्यापीठातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीदेखील याप्रकरणी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. केवळ नागपूरला विद्यापीठ असावे म्हणून काही महत्त्वाकांक्षी लोक मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप अधिकाऱ्यांनी केला आहे, तर कोणत्याही परिस्थितीत विद्यापीठाचे विभाजन होऊ दिले जाणार नाही. याउलट आरोग्य विज्ञान विद्यापीठाला अधिक सक्षम करण्यासाठी निधी आणि पदे मंजूर करावीत अशी भूमिका आमदारांनी घेतली आहे.
आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकचे भूषण मानले जाते. विद्यापीठाने दिवसेंदिवस सुदृढ आणि सक्षम होत असताना विभाजनाचा मुद्या पुढे करण्यात आला आहे. वास्तविक नव्या विद्यापीठाची स्थापना करण्यासाठी लागणाऱ्या खर्चापेक्षा कितीतरी कमी निधी आरोग्य विद्यापीठाला देऊ केला, तर विद्यापीठातच आयुषसह सर्व फॅकल्टीचे चांगले काम होऊ शकते असा दावा विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी केला आहे. केवळ राजकीय हेतूने विभाजनाचा निर्णय घेऊ नये अशी भावनाही कर्मचाऱ्यांनी बोलून दाखविली. दरम्यान, यासंदर्भात विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय घेतला असून, नाशिकची अस्मिता जपण्यासाठी विद्यापीठाचे विभाजन होऊ देणार नसल्याची भूमिका घेतली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Opposition to the division of the university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.