करवाढीविरोधात माकपा आक्रमक महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयासमोर निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 12:53 AM2018-03-04T00:53:55+5:302018-03-04T00:53:55+5:30
सिडको : महापालिकेच्या प्रस्तावित घरपट्टी व पाणीपट्टी दरवाढीच्या विरोधात शनिवारी माकपाच्या वतीने महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
सिडको : महापालिकेच्या प्रस्तावित घरपट्टी व पाणीपट्टी दरवाढीच्या विरोधात शनिवारी माकपाच्या वतीने महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. त्यानंतर विभागीय अधिकाºयांना निवेदन देण्यात आले. मनपाने अवास्तव दरवाढ मागे घ्यावी अन्यथा यापुढील काळात माकपा आक्रमक भूमिका घेणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. माकपाच्या वतीने आज मोर्चा काढून करवाढीच्या विरोधात मनपाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. महापालिकेने सर्वसामान्य नागरिकांना न परवडणारी अशी घरपट्टी व पाणीपट्टीत वाढ करण्याची तयारी सुरू केली असून, यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सत्ताधारी पक्षाकडून सर्वसामान्य नाशिककर, कष्टकरी कामगार व स्वयंरोजगार करणारे, चाकरमाने अशा सर्वांवरच अन्यायकारक करवाढ लादली जाणार असून, नागरिकांची दिशाभूल करण्यात आली असल्याचा आरोपही माकपाच्या वतीने करण्यात आला आहे. या मोर्चात माजी नगरसेवक अॅड. तानाजी जायभावे, दिनेश सातभाई, संतोष काकडे, प्रा. व्यंकट कांबळे, तुकाराम सोनजे, संदीप आहेर, दीपक गहिवाल, विजया टिक्कल, अनिल भागवत, प्रभाकर वाहुळे, सुशीला आहेर, रत्नमाला सोनजे आदी सहभागी झाले होते.