एकलहरे वीज केंद्रात सर्वपक्षीय द्वारसभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2019 12:39 AM2019-01-26T00:39:12+5:302019-01-26T00:39:26+5:30
येथील ६६० मेगावॉट क्षमतेचा मंजूर प्रकल्प त्वरित सुरू करावा. तोपर्यंत सध्या सुरू असलेले २१० मेगावॉटचे तीनही संच सुरू ठेवावेत. यामागणीसाठीएकलहरे वीज केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची द्वारसभा होऊन सरकारला निर्वाणीचा इशारा देण्यात आला.
एकलहरे : येथील ६६० मेगावॉट क्षमतेचा मंजूर प्रकल्प त्वरित सुरू करावा. तोपर्यंत सध्या सुरू असलेले २१० मेगावॉटचे तीनही संच सुरू ठेवावेत. यामागणीसाठीएकलहरे वीज केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची द्वारसभा होऊन सरकारला निर्वाणीचा इशारा देण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार योगेश घोलप यांनी, एकलहरे प्रकल्प बंद झाल्यास त्याचे परिणाम भोगण्याची तयारी राज्यकर्त्यांनी ठेवावी, असा इशारा दिला, तर आर.पी.आय.चे सरचिटणीस संजय भालेराव यांनी मुख्यमंत्र्यांनी नाशिकला दत्तक घेतले आहे, परंतु ते सावत्रपणाची वागणूक देत असल्याचे सांगितले.
यावेळी विशाल संगमनेरे, नाना लोंढे, शंकर गडाख, अशोक घेगडमल यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. सभेनंतर मुख्य अभियंता उमाकांत निखारे यांना निवेदन देण्यात आले. सभेस रामबाबा पठारे, समीरभाई शेख, दिलीप साळवे, भाऊसाहेब जगताप, विशाल घेगडमल, गुंफाताई भदरगे, संजय मोरे, किशोर बागुल, विश्वनाथ होलीन, मोहन निंबाळकर, बाबू गोलपल्ली, आसाराम शिंदे, संजय बारसकर, शरद फेगडे, अरुण आहिरे, बाळू पवळे, बाळू मोरे, पांडू पाटील, मधु पाटील आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.