ओेझरखेड कालव्याचे पाणी जायकवाडीला देण्यास आक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 06:15 PM2018-10-25T18:15:51+5:302018-10-25T18:16:28+5:30
ओझरखेड कालव्याचे पाणी जायकवाडीला सोडू नये, ओझरखेड कालव्याचे आवर्तन तातडीने सोडावे आणि निफाड व येवला तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीचे निवेदन पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना पंचायत समिती सदस्य शिवा सुरासे, खडक माळेगावचे सरपंच दत्त रायते, कोटमगावचे सरपंच तुकाराम गांगुर्डे, शिरवाडेचे सरपंच शरद काळे यांसह पदाधिकाऱ्यांनी नाशिक येथे दिले.
लासलगाव : ओझरखेड कालव्याचे पाणी जायकवाडीला सोडू नये, ओझरखेड कालव्याचे आवर्तन तातडीने सोडावे आणि निफाड व येवला तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीचे निवेदन पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना पंचायत समिती सदस्य शिवा सुरासे, खडक माळेगावचे सरपंच दत्त रायते, कोटमगावचे सरपंच तुकाराम गांगुर्डे, शिरवाडेचे सरपंच शरद काळे यांसह पदाधिकाऱ्यांनी नाशिक येथे दिले.
ओझरखेड कालव्याअंतर्गत येणाºया गावांमध्ये गेल्या पाच वर्षांपासून दुष्काळजन्य परिस्थिती आहे. यावर्षीही समाधानकारक पाऊस न झाल्याने परिसरात शेतकरीवर्गापुढे मोठे संकट उभे राहिले आहे. निफाड तालुक्यातील उत्तर-पूर्व भागात आजही भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. ओझरखेड कालव्याच्या लाभ क्षेत्रामध्ये ७०हून अधिक पाणी वाटप सहकारी संस्था आहेत. त्यामुळे या परिसरातील शेतकºयांनी या कालव्याच्या भरोशावर द्राक्षबागेसाठी दीर्घ मुदतीचे कर्ज घेतले असून, आपल्या द्राक्षबागा उभ्या केल्या आहे. ओझरखेड कालव्यातून चांदवड तालुक्यासाठी ३६ गावांना पाणीपुरवठा केला जातो. या सर्व भौगोलिक परिस्थितीचा विचार केला असता ओझरखेड धरणातून जायकवाडीत पाणीपुरवठा केल्यास या भागात भीषण पाणीटंचाई जाणवू शकते. यासाठीचे निवेदन पालकमंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आले. यावेळी शरद काळे, माधवराव ढोमसे, रावसाहेब रायते, मोतीराम रायते, विठ्ठल कहाने, सारोळे, सरपंच कैलास भोसले, वनसगाव सरपंच उमेश डुंबरे, योगेश रायते, ईश्वर शिंदे, चांगदेव शिंदे, संतोष बोराडे, रामनाथ शिंदे, नंदू काळे, शंकर शिंदे, दत्ता मापारी, नंदू खुर्द, दादासाहेब खराटे तसेच विविध गावांतील पाणीवापर संस्थांचे चेअरमन व सरपंच तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.