ग्रामीण रु ग्णालयातील कोवीड सेंटरला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 02:49 PM2020-09-05T14:49:27+5:302020-09-05T14:50:07+5:30
पेठ : तालुक्यातील रु ग्णांसाठी एकमेव असलेल्या पेठच्या ग्रामीण रु ग्णालयात कोवीड सेंटर सुरू करण्यात येऊ नये, नाशिक ते गुजरात महामार्गाची झालेली दुरवस्था, वाढीव वीज बीले कमी करावीत, आठवडे बाजार सुरू करावेत आदी मागण्यांसाठी शिवसेनेसह महाविकास आघाडीने निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

आरोग्य सुविधेच्या दृष्टीने पेठ तालुक्यातील रु गणांसाठी ग्रामीण रु ग्णालय एकमेव आधार असून या ठिकाणी कोवीड सेंटर सुरू केल्यास नियमित उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होईल तसेच नाशिक ते गुजरात महामार्गावर एकच वर्षात खड्डे पडल्याने या कामाची चौकशी व्हावी, लॉकडाऊन काळात व्यवहार बंद असतांनाही भरमसाठ विजबीले देण्यात आली. ती संपूर्ण माफ करावी, छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आल्याने तालुक्यातील आठवडे बाजार सुरू करण्यास परवानगी द्यावी आदी मागण्यासंदर्भात चर्चा करून मागण्या मान्य न झाल्यास १० सप्टेबर रोजी महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असे तहसीलदार व पोलीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख भास्कर गावीत, नगराध्यक्ष मनोज घोंगे, सभापती विलास अलबाड, तुळशिराम वाघमारे, मोहन कामडी, विशाल जाधव, भागवत पाटील, पुंडलिक महाले, संतोष डोमे, प्रकाश धुळे आदी उपस्थित होते.