दारू दुकानास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 12:24 AM2017-11-05T00:24:24+5:302017-11-05T00:24:30+5:30

अंबड येथील चुंचाळे शिवारात दत्तनगर भागात असलेल्या देशी दारू दुकानास परिसरातील रहिवाशांकडून विरोध करण्यात आला असून, आज स्थानिक नागरिकांनी दुकानासमोरच ठिय्या मांडून दुकानावर दगडफेक करत दुकान बंद पाडले. तसेच याबाबत निषेध नोंदवित अंबड पोलिसांना निवेदन दिले.

Opposition to the liquor shop | दारू दुकानास विरोध

दारू दुकानास विरोध

googlenewsNext

सिडको : अंबड येथील चुंचाळे शिवारात दत्तनगर भागात असलेल्या देशी दारू दुकानास परिसरातील रहिवाशांकडून विरोध करण्यात आला असून, आज स्थानिक नागरिकांनी दुकानासमोरच ठिय्या मांडून दुकानावर दगडफेक करत दुकान बंद पाडले. तसेच याबाबत निषेध नोंदवित अंबड पोलिसांना निवेदन दिले.  चुंचाळे शिवारातील देशी दारू दुकान हे नागरीवस्तीत तसेच जवळच शाळा असल्याने मद्यपींचा नागरिकांना त्रास होत आहे. सदरचे दुकान कायमचे बंद करावे यासाठी परिसरातील नागरिकांनी नगरसेवक राकेश दोंदे यांची भेट घेतली. दोंदे यांनी याबाबत आज परिसरातील नागरिकांना बरोबर घेत दुकानासमोरच ठिय्या मांडत निषेध नोंदविला तसेच अंबड पोलिसांनी निवेदन दिले.  या निवेदनात गेल्या ३० वर्षांपासून या परिसरात नागरीवस्ती असून, आज यात वाढ झाली आहे. या देशी दारू दुकानामुळे परिसरातील नागरिक व महिलांना मद्यपींचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच औद्योगिक क्षेत्रात मोलमजुरी व कारखाना कामगार म्हणून काम करणाºया सुसंस्कृत, धार्मिक व सामान्य कामगार वर्गाचा समावेश आहे. याबरोबरच या भागातच दैनंदिन भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या बाजारपेठ व रहिवास क्षेत्र आहे. तसेच याच परिसरात दोन शाळा असल्याने विद्यार्थ्यांवरही याचा परिणाम होत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, नगरसेवक राकेश दोंदे यांनी परिसरातील नागरिकांना बरोबर घेत देशी दारू दुकान बंद करावे यासाठी अंबड पोलीस ठाºयाचे पोलीस निरीक्षक मधुकर कड यांची भेट घेत  निवेदन दिले. 
चुंचाळे शिवारात दत्तनगर भागात असलेले देशी दारू दुकान हे बंद करण्याबाबत जिल्हाधिकाºयांना अधिकार असून, दुकान बंद करण्यासाठी मतदान घेण्यात येऊ शकते याबाबतचे अधिकार पोलिसांकडे नसून ते जिल्हाधिकाºयांचे आहे. परंतु परिसरातील नागरिकांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे कायदा व सुव्यवस्था कोणी बिघडवू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल.
- मधुकर कड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंबड 
दत्तनगर भागातील देशी दारू दुकानामुळे परिसरातील महिला व नागरिकांना मद्यपींचा त्रास सहन करावा लागत आहे. याच रहिवासी परिसरात शाळा असल्याने याचा विद्यार्थ्यांवर परिणाम होत आहे. याबाबत जिल्हाधिकाºयांना याआधी अनेकदा निवेदन दिले असतानाही अद्याप दुकान बंद करण्यात आले नसून यापुढील काळात दुकान कायमचे बंद न झाल्यास जनआंदोलन उभारणार.
- राकेश दोंदे, नगरसेवक

Web Title: Opposition to the liquor shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.