पंचायत समिती कार्यालय हलविण्यास विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 01:00 AM2021-07-25T01:00:06+5:302021-07-25T01:00:28+5:30
देवगांव : त्र्यंबकेश्वर पंचायत समिती कार्यालय शहरात नियमानुसार कार्यरत आहे. परंतु पंचायत समिती कार्यालय शहरापासून ३ किलोमीटर अंतरावर पेगलवाडीला हलविण्याचा घाट पुन्हा एकदा घातला जात असून यास तालुक्यातील जनतेचा तीव्र विरोध आहे. पंचायत समिती कार्यालय अन्यत्र हलविल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र जनआंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
देवगांव : त्र्यंबकेश्वर पंचायत समिती कार्यालय शहरात नियमानुसार कार्यरत आहे. परंतु पंचायत समिती कार्यालय शहरापासून ३ किलोमीटर अंतरावर पेगलवाडीला हलविण्याचा घाट पुन्हा एकदा घातला जात असून यास तालुक्यातील जनतेचा तीव्र विरोध आहे. पंचायत समिती कार्यालय अन्यत्र हलविल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र जनआंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यांसंदर्भात तहसीलदार दीपक गिरासे, सभापती मोतीराम दिवे, गटविकास अधिकारी यांना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष पवन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष उमेश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले आहे.
त्र्यंबकेश्वर पंचायत समिती कार्यालय अन्यत्र हलविल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळी युवक तालुकाध्यक्ष तानाजी गांगुर्डे, त्रिंबक नगर परिषद माजी सभापती बंडू खोडे, माजी नगरसेवक शंकर जाधव, मोहन सोनवणे, संपत चहाळे, कृष्णा काशीद, योगेश रोकडे, श्याम शिंदे, किरण महाले, शिवाजी सोनवणे, अंकुश सोनवणे, श्याम कोथमिरे, गणेश ताठे, प्रकाश जाधव, संपत गांगुर्डे, समाधन शिंदे, पिंटू कदम, सक्रु शिद, हरिष तुपलोंढे, काळु पालवे, राजू झोले, प्रशांत बोराडे आदी उपस्थित होते.