चणकापूर धरणातून कळवणला जाणाऱ्या पाइपलाइनला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:17 AM2021-09-14T04:17:26+5:302021-09-14T04:17:26+5:30
निवेदनात म्हटले आहे, कळवण शहरासाठी आमदार नितीन पवार यांच्या माध्यमातून २५ कोटी रुपयांची नळपाणीपुरवठा योजना शासनस्तरावरून मंजूर ...
निवेदनात म्हटले आहे, कळवण शहरासाठी आमदार नितीन पवार यांच्या माध्यमातून २५ कोटी रुपयांची नळपाणीपुरवठा योजना शासनस्तरावरून मंजूर केली आहे. या योजनेचे लवकरच काम सुरू होणार आहे. या योजनेमुळे तालुक्यातील गोसरणे, बार्डे, दह्याने, कळमथे, पाळेखुर्द, पाळे बुद्रूक, आसोली, मानूर, एकलहरे, कळवण, नाकोडा, जुनीबेज, नवीबेज, भादवन, बगडू, पिळकोस येथील शेती पूर्णतः उद्ध्वस्त होणार आहे. तसेच पश्चिम भागातील १७ खेडे या नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. येथील सर्वच गाव व पाणीपुरवठा योजना कोरड्याठाक पडणार आहेत. या योजनेमुळे एका गावाला मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असून, इतर सर्व गावांना तीव्र पाणीटंचाई जाणवणार आहे. कळवण शहराची योजना मार्गी लागल्यास उद्या देवळा, मालेगाव व इतर सर्वच गावे थेट पाइपलाइनने पाणीपुरवठा योजनेची मागणी करतील. धरणातील सर्वच पाणी पाइपलाइनने आरक्षित झाल्यास नदीला फक्त पूरपाणी उपलब्ध होईल व जानेवारी नंतरचे सर्वच आवर्तने रद्द होतील. पाण्याची मागणी वाढणार आहे. परंतु धरणातील साठा मात्र तेवढाच राहणार असल्याने शेती आणि शेतकरी यांचे जीवन पूर्णतः उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी हरी पाटील, प्रभाकर पाटील, भरत शिंदे, मोहन जाधव, भीमराव देवरे, बाळासाहेब गांगुर्डे, नामदेव गांगुर्डे, रामदास देवरे, युवराज पवार, नारायण गांगुर्डे, सचिन पाटील, विक्रम वाघ, सौरभ पाटील, वसंत पाटील, जाधव, नीलेश जाधव, सुधाकर जाधव, दीनानाथ शिरसाठ, रवींद्र पाटील, विजय चव्हाण, मधुकर भदाणे, कैलास पाटील आदींसह शेतकरी बांधव उपस्थित होते.
इन्फो
अन्यथा आंदोलनाचा इशारा
स्थानिक शेतकऱ्यांचा विचार करून नदी प्रवाहाने ज्यांना हवे त्यांना पाणी द्यावे. त्यास कोणताच शेतकरी विरोध करणार नाही. शासनाने शेतकरी हितासाठी सदर प्रस्ताव नामंजूर करून थेट पाइपलाइनचे कोणतेच प्रस्ताव मंजूर करू नयेत. तसे न झाल्यास गिरणा नदी बचाव समिती कडील कळवण तालुक्यातील गोसरणे, बार्डे, दह्याने, कळमथे, पाळेखुर्द, पाळे बुद्रूक, आसोली, मानूर, एकलहरे, कळवण, नाकोडा, जुनीबेज, नवीबेज, भादवन, बगडू, पिळकोस येथील शेतकरी तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा देण्यात आला आहे.
फोटो- १३ चणकापूर निवेदन
चणकापूर धरणातून जाणाऱ्या पाइपलाइनबाबत तहसीलदार बी. ए. कापसे यांना निवेदन देताना शेतकरीवर्ग.
130921\13nsk_26_13092021_13.jpg
फोटो- १३ चणकापूर निवेदन