रेल्वे मजदूर संघाचा खासगीकरणास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 05:45 PM2019-07-23T17:45:00+5:302019-07-23T17:45:19+5:30

मनमाड : केंद्र सरकारच्या कामगारविरोधी खासगीकरणाविरोधात येथील रेल्वे कारखान्यातील सेंट्रल रेल्वे मजदूर संघ शाखेच्या वतीने काळ्या फिती लावून निषेध नोंदविण्यात आला.

Opposition to Privatization of Railway Workers Union | रेल्वे मजदूर संघाचा खासगीकरणास विरोध

रेल्वे मजदूर संघाचा खासगीकरणास विरोध

Next

मनमाड : केंद्र सरकारच्या कामगारविरोधी खासगीकरणाविरोधात येथील रेल्वे कारखान्यातील सेंट्रल रेल्वे मजदूर संघ शाखेच्या वतीने काळ्या फिती लावून निषेध नोंदविण्यात आला. केंद्र सरकारने वाराणसी, रायबरेली, भायखळा प्रिंटींग प्रेस येथे उत्पादन युनिट व प्रवासी ट्रेनचे संचालन, १४० रेल्वे स्टेशनचे, चेकिंग स्टाफ यांचे खासगीकरण करून त्यांना रेल्वेत शिरकाव करण्याचा डाव आखला आहे. याबाबत कामगारांमध्ये प्रचंड असंतोष पसरला असून, आपल्या येणाऱ्या पिढीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. देशात बेरोजगारीची संख्या वाढत असताना त्यातच कामगार कपात करून सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण करून बेरोजगारीमध्ये भर पाडण्यात येत आहे. याचा निषेध करण्यासाठी कामगार संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी सचिव नितीन दिलीप पवार, कार्याध्यक्ष महेंद्र चौथमल, एकनाथ पाटील, अध्यक्ष प्रकाश बोडके यांनी कामगारांना संबोधित केले. आंदोलनात बहुसंख्य कामगार सहभागी झाले होते.

Web Title: Opposition to Privatization of Railway Workers Union

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.