आजच्या बंदसाठी विरोधी पक्ष सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:12 AM2020-12-08T04:12:33+5:302020-12-08T04:12:33+5:30
चौकट== बाजार समिती बंद केंद्र सरकारच्या निषेधार्थ नाशिक बाजार समितीही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बंदमुळे शेतकऱ्यांच्या ...
चौकट==
बाजार समिती बंद
केंद्र सरकारच्या निषेधार्थ नाशिक बाजार समितीही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बंदमुळे शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी मालाची तोड करू नये, असे आवाहन बाजार समिती सभापती देवीदास पिंगळे यांनी केले आहे.
चौकट=======
इंटकचाही पाठिंबा
मंगळवारच्या भारत बंदला इंटक या कामगार संघटनेने पाठिंबा दर्शविला असून, शेतकरी व कामगार विरोधी धोरणाला विरोध दर्शविण्यासाठी केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीने बंदची हाक दिली असल्याने या बंदमध्ये इंटक सहभागी होणार असल्याचे राज्य अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी जाहीर केले आहे.
चौकट====
अत्यावश्यक सेवा सुरू राहणार
सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंतच हा बंद पाळण्यात येणार असला तरी, या बंदमधून अत्यावश्यक सेवा म्हणजेच भाजीपाला, दूध, औषधे, अन्नधान्याची वाहतूक सुरू राहणार आहे.
चौकट===
मालवाहतूक बंद राहणार
ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसची तातडीची बैठक होऊन त्यात शेतकरी आंदोलन, भारत बंदला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. या बंदमध्ये जिल्ह्यातील सर्व मालवाहतूकदार सहभागी होणार असून, रस्त्यावर माल वाहतूक केली जाणार नसल्याची माहिती मोटार ट्रान्सपोर्टचे अध्यक्ष सचिन जाधव यांनी दिली.
चौकट===
शिवसेनेची भूमिका गुलदस्त्यात
भारत बंदमध्ये शिवसेनेचा सक्रिय सहभाग असणार असल्याचे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी जाहीर केले असता, स्थानिक पातळीवर मात्र सर्वपक्षीय आवाहन फेरीत व पत्रकार परिषदेला शिवसेनेच्या एकाही नेत्याने हजेरी लावली नाही त्यामुळे सेनेच्या भूमिकेविषयी संभ्रम व्यक्त केला जात आहे. या भारत बंदमध्ये हिंदू एकता पक्ष सहभागी नसल्याचे रामसिंग बावरी यांनी जाहीर केले आहे.