ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षणास विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 12:50 AM2018-07-01T00:50:12+5:302018-07-01T00:50:41+5:30
मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास आमचा विरोध असून, अशाप्रकारचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यास भविष्यात उद््भवणाऱ्या प्रसंगांना शासनाने तयार रहावे, असे प्रखट मत ओबीसी फाउण्डेशन संघटनेचे राष्टÑीय अध्यक्ष संजय कोकरे यांनी व्यक्त केले.
सिडको : मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास आमचा विरोध असून, अशाप्रकारचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यास भविष्यात उद््भवणाऱ्या प्रसंगांना शासनाने तयार रहावे, असे प्रखट मत ओबीसी फाउण्डेशन संघटनेचे राष्टÑीय अध्यक्ष संजय कोकरे यांनी व्यक्त केले. सिडकोतील भोळे मंगल कार्यालयात ओबीसी फाउंडेशनच्या वतीने ओबीसी दिनानिमित्त आयोजित जिल्ह्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक, व सांस्कृतिक उपक्र मासाठी विशेष कार्य करणाºया माान्यवरांचा सन्मान कर्तृत्वाचा पुस्कार देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी युवा लेखक हनुमंत चव्हाण यांच्या कर्म ही भाग्य या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी बोलताना संजय कोकरे म्हणाले मराठा समाजाला आरक्षण मिळणे ही काळाची गरज असून, त्यांना ओबीसी समाजाच्या २७ टक्के कोट्याला हात न लावता स्वतंत्र आरक्षण देण्यास मात्र आमची हरकत आहे. ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याचा सरकारचा घाट असून, त्यास विरोध असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले, तर भाजपाच्या आमदार सीमा हिरे यांनी ओबीसी फाउण्डेशनचे कार्य कौतुकास्पद असून, ओबीसी समाजाकरिता आपणही शासनदरबारी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाप्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव करण्यात आला. यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, बीएमए ग्रुपचे संस्थापक मोहन अढांगळे, सुनीता मोडक, जयदीप पवार, रवि एरंडे, भागवत उदावंत, प्रल्हाद भांड, भूषण मटकरी आदींचा समावेश होता. याप्रसंगी भाउसाहेब आव्हाड, साहेबराव पानसरे, किरण थोरात, भारत सोनवणे, दीपक वाघ, संजय जाधव, मगन पाटील, विष्णू आव्हाड, सचिन आव्हाड, संगीता अहिरराव आदी उपस्थित होते.