रिपाइं सेक्युलर पक्षाची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:23 AM2018-04-24T00:23:38+5:302018-04-24T00:23:54+5:30

देशात महिला व अल्पवयीन मुलींवर वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (सेक्युलर)च्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकारच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात येऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी विविध घोषणांचे फलक घेतले होते

Opposition of the RPI Secular Party | रिपाइं सेक्युलर पक्षाची निदर्शने

रिपाइं सेक्युलर पक्षाची निदर्शने

Next

नाशिक : देशात महिला व अल्पवयीन मुलींवर वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (सेक्युलर)च्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकारच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात येऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.यावेळी आंदोलनकर्त्यांनी विविध घोषणांचे फलक घेतले होते. ‘फाशी द्या, फाशी द्या, बलात्काºयांना फाशी द्या’, ‘सरकारचा निषेध असो’ अशा घोषणाही देण्यात आल्या. जिल्हाधिकाºयांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कथुआ येथील घटना मानवतेला काळिमा फासणारी असताना भाजपाच्या दोन मंत्र्यांनी या घटनेतील आरोपींना वाचविण्यासाठी मोर्चा काढला, सुरतमध्येही एका बालिकेवर अत्याचार करून खून करण्यात आला. उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये भाजपाच्या बाहुबली आमदाराने मुलीवर बलात्कार केला या सर्व घटना पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन पाळले आहे. त्यामुळे अशा अत्याचारीत आरोपींना फाशीची शिक्षा द्या, कथुआ घटनेत आरोपींच्या बाजूने मोर्चा काढणाºयांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, जम्मूच्या बार कौन्सिलच्या वकिलांची सनद रद्द करा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या आंदोलनात विजय बागुल, संतोष पगारे, कृष्णा शिलावट, शंकर भदर्गे, मुन्नीआपा पठाण, अंजली जाधव, विवेक तांबे, वसीम शेख, ज्योती अटकडे आदी सहभागी झाले होते.

Web Title: Opposition of the RPI Secular Party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.