समृद्धी महामार्गाला विरोध : कर्मचाऱ्यांना  माघारी धाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:16 AM2018-03-26T00:16:26+5:302018-03-26T00:16:26+5:30

प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला सिन्नर तालुक्यातील शिवडे येथील शेतकºयांचा विरोध असताना रविवारी अचानक मोजणीसाठी काही कर्मचारी आले. याची माहिती शेतकºयांना मिळताच शेतकºयांनी त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली. कर्मचाºयांनी माफी मागितल्यानंतर चार तासांनंतर शेतकºयांनी त्यांची सुटका केली.

Opposition to the Samrudhi highway: Employees returned | समृद्धी महामार्गाला विरोध : कर्मचाऱ्यांना  माघारी धाडले

समृद्धी महामार्गाला विरोध : कर्मचाऱ्यांना  माघारी धाडले

Next

सिन्नर : प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला सिन्नर तालुक्यातील शिवडे येथील शेतकºयांचा विरोध असताना रविवारी अचानक मोजणीसाठी काही कर्मचारी आले. याची माहिती शेतकºयांना मिळताच शेतकºयांनी त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली. कर्मचाºयांनी माफी मागितल्यानंतर चार तासांनंतर शेतकºयांनी त्यांची सुटका केली. प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग सिन्नर तालुक्यातून जात आहे. मात्र पश्चिम पट्ट्यातील बागायती भागातील काही गावांनी त्यास तीव्र विरोध केला आहे. शिवडे गाव विरोधाचे केंद्रबिंदू आहे. शिवडे येथील शेतकºयांनी अद्याप मोजणी होऊ दिलेली नाही.  या पार्श्वभूमीवर शिवडे शिवारातील पाईणीचा मळा परिसरात रविवारी सकाळी एल अ‍ॅण्ड टी कंपनीचे पाच कर्मचारी ड्रोन मोजणीसाठी आले होते. याची माहिती या परिसरातील शेतकºयांनी इतर शेतकºयांना दिल्यानंतर पाईणीच्या मळ्यात मोठ्या संख्येने शेतकरी एकत्र आले. सुमो जीप घेऊन आलेल्या या पाच कर्मचाºयांना शेतकºयांनी मोजणीच्या साहित्यासह ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विचारपूस केल्यानंतर त्यांनी समृद्धीच्या मोजणीसाठी आलो असल्याचे सांगितले. त्यानंतर संतप्त शेतकºयांनी त्यांचे साहित्य ताब्यात घेतले. मात्र कर्मचाºयांनी शेतकºयांचा विरोध असल्याची आपल्याला माहिती नसल्याचे सांगून माफी मागितली. दुपारी ४ वाजता शेतकºयांनी त्यांचे मोजणीचे साहित्य देऊन गावातून काढून दिले. यापूर्वीही पाच वेळा शिवडे येथे मोजणीसाठी प्रयत्न झाला आहे. मात्र शेतकºयांनी त्यास विरोध करून मोजणीसाठी आलेल्या अधिकाºयांना माघारी धाडले आहे. मोजणीच्या वेळी शिवडे येथे हिंसक वळण लागल्याचीही घटना घडली होती. त्यानंतर शिवडे येथील मोजणी काही काळासाठी पुढे ढकलण्यात आली होती. रविवारी मोजणीचा पुन्हा प्रयत्न झाल्यानंतर शेतकºयांनी कर्मचाºयांना माघारी धाडले.
शेतकयांचा विरोध कायम
गेल्या दीड महिन्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवडे येथील शेतकºयांसोबत बैठक घेतली होती. त्यात शेतकºयांनी काही अटी व शर्ती ठेवल्या होत्या. शिंदे यांनी या अटी उच्चस्तरीय समितीसमोर ठेवणार असल्याचे सांगितले होते. मात्र दीड महिन्यानंतर शेतकºयांनी ठेवलेल्या अटी व शर्तींचे काय झाले हे समजले नाही. या पार्श्वभूमीवर कर्मचारी शिवडे गावात मोजणीसाठी आल्यानंतर शेतकºयांनी संताप व्यक्त करून माघारी धाडले.

Web Title: Opposition to the Samrudhi highway: Employees returned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.