मुलतानपुरा रुग्णालय सुरू करण्यास विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 10:09 PM2020-06-20T22:09:41+5:302020-06-20T23:31:18+5:30
नाशिक : सध्या जुन्या नाशिकमध्ये कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता महापालिकेने मुलतानपुरा रुग्णालय सुरू करण्याची तयारी असताना दुसरीकडे मात्र स्थानिक नागरिकांनी मात्र विरोध केला आहे. शुक्रवारी (दि.१९) आयुक्त राधाकृष्ण गमे आणि अन्य अधिकाऱ्यांनी भेट दिली, तेव्हा या भागातील काही नागरिकांनी त्यास कडाडून विरोध केला. या भागात कोरोना रुग्ण दाखल झाल्यास आणखी गंभीर स्थिती निर्माण होईल या भीतीपोटी विरोध झाला तर आहेच, परंतु सध्या तर नियोजित प्रसूतिगृह सुरू करण्यासदेखील विरोध करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

मुलतानपुरा येथे मनपाच्या वतीने प्रसूतिगृह आणि रुग्णालय तयार करण्यात आले असून, सुमारे तीन वर्षांपासून राजकीय वादात हे वापराविना पडून आहे. सध्या या भागात कोरोनाचे रुग्ण वाढत
आहेत. त्यातच जुने नाशिक भागातीलच नव्हे तर अन्य
भागांतील कोरोनाबाधितांसाठी महापालिकेने डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय राखीव ठेवले आहे. त्यामुळे अन्य आजारांवरील उपचारासाठी वेगळी व्यवस्था नसल्याने कोरोनाशिवाय अन्य आजारांच्या रुग्णांसाठी हे रुग्णालय सुरू करावी, अशी काही स्थानिक नागरिकांची मागणी आहे. त्या पार्श्वभूमीवर झालेल्या महासभेत प्रभागातील नगरसेविका समिना मेमन यांनी प्रश्न उपस्थित केला होता. मात्र, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी अपुरे मनुष्यबळ असल्याने रुग्णालय सुरू करण्यास हतबलता दर्शविली होती.सदरचे रुग्णालय सुरू करण्यावरून स्थानिक नगरसेवकांत मतभेद आहेत. त्यामुळे या विषयावर राजकारण सुरू आहे. आयुक्तांचा दौरा पूर्वनियोजित नव्हता. मात्र, यानंतरही अचानक भेटीच्या वेळी विरोध करणारे कोठून आले? असा प्रश्न समिना मेमन यांनी उपस्थित केला आहे, तर राजकीय मतभेदांमुळे रुग्णालय सुरू होण्यात अडचणी येत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.