मुख्यालयी राहण्याचे दाखले देण्यास शिक्षक संघाचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 11:03 PM2019-10-08T23:03:05+5:302019-10-08T23:03:44+5:30
सिन्नर: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा मेळावा चांदवड तालुक्यातील मंगळूर फाटा येथील रेणुका हॉल येथे पार पडला. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य कार्याध्यक्ष अंबादास वाजे यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा झाला. यावेळी नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एक आदर्श शाळा, गुणवंत शिक्षक आणि गुणवंत शिक्षिका यांचा गौरव जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने आयोजित करण्यात आला. सिन्नर तालुक्यातील रवींद्र गांगुर्डे, वैशाली सायाळेकर तसेच जि.प. शाळा धोंडवीरनगरचा गौरव करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क

यावेळी जिल्हाभरातून अतिशय मोठ्या प्रमाणावर शिक्षक उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य कार्याध्यक्ष वाजे यांनी नाशिक जिल्ह्यातील शिक्षक बांधवांनी कोणत्याही परिस्थितीत मुख्यालयी राहण्याचा दाखला देऊ नये असे स्पष्टपणे सांगितले. यासंदर्भात राज्य कार्यकारिणीच्या वतीने संबंधित मंत्र्यांची भेट घेऊन सदर विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले आहेत; मात्र सध्या आचारसंहिता सुरू असल्याने आचारसंहिता संपल्यावर हा प्रश्न सुटेल. जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने लवकरच मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन सदर प्रश्न आणि त्याबद्दलची माहिती दिली जाणार आहे.
या मेळाव्यास नाशिक जिल्ह्यातील सर्व प्रमुख राज्यपदाधिकारी, जिल्हापदाधिकारी, तालुकापदाधिकारी महिला पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्र म यशस्वीतेसाठी प्रयत्न चांदवड तालुका कार्यकारिणी व जिल्हा कार्यकारणीने विशेष मेहनत घेतली.