तिसगाव-नांदगाव मार्गाला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:12 AM2018-03-24T00:12:06+5:302018-03-24T00:12:06+5:30

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सध्या दिंडोरी तालुक्यातील तिसगाव ते नांदगाव असा राज्यमार्ग तयार करण्याचे काम प्रगतिपथावर सुरू असून, बुधवारी (दि. २१) वडनेरभैरव येथील शेतकऱ्यांनी या महामार्गाच्या कामाला विरोध केला आहे. वडनेरभैरव शिवारात या राज्यमार्गाचे काम सुरू आहे.

Opposition to Tisgaon-Nandgaon Marg | तिसगाव-नांदगाव मार्गाला विरोध

तिसगाव-नांदगाव मार्गाला विरोध

Next

वडनेरभैरव : सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सध्या दिंडोरी तालुक्यातील तिसगाव ते नांदगाव असा राज्यमार्ग तयार करण्याचे काम प्रगतिपथावर सुरू असून, बुधवारी (दि. २१) वडनेरभैरव येथील शेतकऱ्यांनी या महामार्गाच्या कामाला विरोध केला आहे. वडनेरभैरव शिवारात या राज्यमार्गाचे काम सुरू आहे.  वडनेरभैरव-बहादुरीदरम्यान चार किलोमीटरमधील शेतकºयांनी या कामाला विरोध केला आहे. हा रस्ता शिवार रस्ता असून, शेतकºयांनी पूर्वी स्वत:च्या दळणवळणासाठी तयार केला आहे, असे या शेतकºयांचे म्हणणे आहे. सुरुवातीला रस्त्याचे खडीकरण नंतर डांबरीकरण केले आहे. आता सार्वजनिक बांधकाम विभाग या रस्त्याची रुंदी वाढवत आहे. रस्त्याच्या कडेला असलेले घरे, विहिरी, फळझाडे आदीचे मोठे नुकसान होणार आहे. अनेकांचे संसार रस्त्यावर नेणार आहे.  ज्यांचे नुकसान होणार आहे ते सर्व शेतकरी अल्पभूधारक आहेत. येथील शेतकºयांनी या कामाविरोधात सर्वाच्च न्यायालयात याचिका दाखल केली असताना त्यावर निर्णय येण्याआधी काम सुरू झाल्याने शेतकºयांनी विरोध केला आहे. 
इतर मार्ग खुले असताना मालकीच्या रस्त्यावर होत असलेल्या रस्त्यांचे काम आम्हाला मान्य नाही. दळणवळणासाठी इतर अनेक रस्ते असताना चुकीच्या मार्गाने शेतकºयांचे नुकसान करण्याचे काम संबंधित विभाग करत आहे. आमच्या शेतातून आम्ही रस्ता होऊ देणार नाही. - किशोर मोहिते, शेतकरी, वडनेरभैरव

Web Title: Opposition to Tisgaon-Nandgaon Marg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक