मनपाच्या तिजोरीवर ३३ कोटींचा झाडू फिरवण्यास विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2021 01:18 AM2021-12-15T01:18:15+5:302021-12-15T01:18:39+5:30
एकीकडे कोरोनामुळे आर्थिक अडचणीचे कारण पुढे करून नागरी कामे अडवली जात असताना दुसरीकडे मात्र, महापालिकेची कोट्यवधी रुपयांची उड्डाणे सुरूच आहेत. १२ कोटींचे झाडू आणि देखभाल दुरुस्तीसह संचालनाचा खर्च मिळून तब्बल ३३ कोटी रुपयांवर खर्च येणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या तिजेारीवरच झाडू फिरवण्याचा हा घाट असल्याची टीका शिवसेनेने केली असून विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते तसेच गटनेता विलास शिंदे यांनी निविदा प्रक्रियाच रद्द करण्याची मागणी केली आहे.
नाशिक : एकीकडे कोरोनामुळे आर्थिक अडचणीचे कारण पुढे करून नागरी कामे अडवली जात असताना दुसरीकडे मात्र, महापालिकेची कोट्यवधी रुपयांची उड्डाणे सुरूच आहेत. १२ कोटींचे झाडू आणि देखभाल दुरुस्तीसह संचालनाचा खर्च मिळून तब्बल ३३ कोटी रुपयांवर खर्च येणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या तिजेारीवरच झाडू फिरवण्याचा हा घाट असल्याची टीका शिवसेनेने केली असून विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते तसेच गटनेता विलास शिंदे यांनी निविदा प्रक्रियाच रद्द करण्याची मागणी केली आहे.
यासंदर्भात शिवसेनेच्या वतीने आयुक्तांना पत्र देण्यात आले असून ही प्रक्रिया रद्द न केल्यास शासनाकडे दाद मागण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
नाशिक शहराचे भौगोलिक क्षेत्र वाढत असून त्या तुलनेत शहर स्वच्छतेसाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने यांत्रिक झाडू खरेदीचा घाट महापालिकेने घातला आहे. ३३ कोटी रुपयांचा ठेका असल्याने त्यासाठी भागीदारीसाठी राजकीय नेतेही पुढे आले आहेत. त्यातच एका जपानी कंंपनीनेदेखील पुढाकार घेतला असून नाशिकच्या रस्त्यांच्या स्थितीवर ती उपयुक्त ठरू शकेल काय, अशी शंकादेखील अजय बोरस्ते
विलास शिंदे यांनी उपस्थित केली आहे. नाशिक शहरात स्वच्छतेचे पारंपरिक काम करणारा वर्ग असून वर्षानुवर्षे हे कामगार स्वच्छतेचे काम करतात. त्यामुळे सत्तारूढ पक्षाच्या दडपणाखाली महापालिकेने अशाप्रकारे यांत्रिकी झाडू खरेदी केल्यास परंपरागत सफाईची कामे करणारे देशोधडीला लागतील, अशी भीती बोरस्ते आणि शिंदे यांनी व्यक्त केली आहे.