दोन दिवसांच्या बंदला व्यापारी महासंघाचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 06:20 PM2021-03-15T18:20:05+5:302021-03-15T18:24:48+5:30
मनमाड : कोरोना महामारीसाठी प्रशासनाने शनिवार, रविवारऐवजी फक्त रविवारी बंद ठेवण्याची मागणी मनमाड शहर व्यापारी महासंघाने केली आहे. कोरोना महामारीने थैमान घातल्यामुळे सकाळी सात ते सायंकाळी सात या कालावधीत व्यापारी वर्गास परवानगी दिली. तसेच शनिवार, रविवार हे दोन दिवस संपूर्ण व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले आहे.

दोन दिवस संपूर्ण व्यवसाय बंद करण्याचा निर्णय पूर्णपणे साध्य होणार नाही. कारण, पाच दिवस वेळेचे बंधन आणि दोन दिवस संपूर्णपणे बंदमुळे शुक्रवार व सोमवार या दिवशी बाजारपेठेत गर्दी वाढण्याचा जास्त धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार कमी न होता तो वाढण्यास मदत होईल.
शनिवार, रविवार असे दोन दिवस बंद न कारता फक्त रविवार एक दिवस बंद करण्याचे आदेश जारी करावे. जेणेकरून शुक्रवार व सोमवार या दिवशी बाजारपेठेत होणारी गर्दी कमी होण्यास मदत होईल, या आशयाचे निवेदन व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, सचिव राजकमल पांडे, दादा बंब, मनोज जंगम, अनिल गुंदेचा, सुरेश लोढा, कुळदीपसिंग चोटमुरदी, किरण पठारे , कल्पेश बेदमुथा, दीपक मुनोत, अनुप बेदमुथा आदी सदस्यांनी पालिका प्रशासनाला दिले.