हरणबारी धरणातील पाणी आरक्षणाला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 05:59 PM2018-10-19T17:59:09+5:302018-10-19T17:59:29+5:30
काटवन भागातील मोसम नदी किनारी असणाऱ्या गावांना तीव्र पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत. दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. भविष्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी हरणबारी धरणातील सातशे दलघफू पाणी आरक्षित करण्यात येऊ नये अशी मागणी सप्तशृंगी पाणी वापर संस्थेसह मोसमकाठच्या गावांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मालेगाव परिसरात दुष्काळाचे सावट पसरले आहे. चारा, पाणी व अन्न-धान्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पर्जन्यमान कमी झाल्याने भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. भविष्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी जलसंधारण विभागाने हरणबारी धरणातुन सातशे दलघफू पाणी आरक्षित करु नये. सदर पाणी मोसमनदी पात्रात सोडून काठावरील गावांचा पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाचा प्रश्न निकाली काढावा अशी मागणी पं.स. सदस्य नंदलाल शिरोळे, खाकुर्डीचे माजी सरपंच पवन ठाकरे, बाळासाहेब भदाणे, पाणी वापर संस्थेचे चेअरमन लक्ष्मण शेलार, कांतीलाल सावळे, नथू शेलार, दयाराम शेलार, अनुसया सावळे, वसंत सोनवणे, रामदास शेलार, अशोक बोरसे, संजय अहिरे, जिजाबाई सोनवणे, नरेंद्र सोनवणे आदिंनी केली आहे.