नदीजोड प्रकल्पाचे पाणी जायकवाडीला देण्यास विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 05:39 PM2019-01-01T17:39:27+5:302019-01-01T17:39:39+5:30
नांदूरशिंगोटे : सविस्तर प्रकल्प अहवाल अंतीम टप्प्यात असताना प्रस्तावित दमणगंगा-एकदरा (पाच टीएमसी) व गारगाई - देवनदी जोड ( सात टीएमसी) प्रकल्पांमधील १२ टीएमसी पाणी पळविण्याचा घाट गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाने घातला आहे.
नांदूरशिंगोटे : सविस्तर प्रकल्प अहवाल अंतीम टप्प्यात असताना प्रस्तावित दमणगंगा-एकदरा (पाच टीएमसी) व गारगाई - देवनदी जोड ( सात टीएमसी) प्रकल्पांमधील १२ टीएमसी पाणी पळविण्याचा घाट गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाने घातला आहे. महामंडळाच्या भूमिकेला राष्टÑवादी जलचिंतन सेल व भोजापूर प्रकल्पावरील पाणीवापर संस्थाच्या महासंघाने विरोध दर्शिवला आहे.
राष्टÑवादी जलचिंतन सेलचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र जाधव, राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड व शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्यासह भोजापूर प्रकल्पावरील पाणीवापर संस्थाच्या अध्यक्षांनी सोमवार (दि. ३१) रोजी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर व जलसंपदाचे मुख्य अभियंता यांना निवेदन देऊन या प्रस्तावित प्रकल्पांच्या समन्यायी पाणीवाटपाच्या निर्णयाला विरोध केला आहे. गेले तीन वर्ष अथक प्रयत्न करून नाशिकचे खासदार हेमंत गोडसे आणि जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाकडून नाशिकच्या उज्वल भविष्यासाठी ‘‘दमणगंगा-एकदरे-गंगापूर धरण’’- क्षमता- ५००० दशलक्ष घनफूट’’ आणि सिन्नरच्या दुष्काळी भागास पाणी देण्यासाठी ‘‘दमणगंगा-गारगाई-वैतरणा-कडवा-देव लिंक ङ्क्त क्षमता - ७००० दशलक्ष घनफूट’’ असे दोन प्रकल्प मंजूर केले. या दोन्ही प्रकल्पांचे सविस्तर प्रकल्प अहवाल बनवण्यासाठी लागणाºया ४२ कोटीच्या खर्चास मान्यता मिळवली.