वॉटर पार्कला धरणातून पाणी देण्यास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 04:39 PM2019-01-14T16:39:48+5:302019-01-14T16:40:17+5:30

शेतकरी एकवटले : अंजेनेरी येथे बैठकीत निर्धार

Opposition to water the water park from the dam | वॉटर पार्कला धरणातून पाणी देण्यास विरोध

वॉटर पार्कला धरणातून पाणी देण्यास विरोध

googlenewsNext
ठळक मुद्दे एकाही नवीन शेतक-यांना पाणी उचलण्यासाठी परवानगी दिली जात नसताना खाजगी व्यवसायास १० टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी वापराची परवानगी दिली गेल्याने शेतक-यांनी संताप व्यक्त केला.

त्र्यंबकेश्वर : यंदा दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांना टंचाई काळात पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठी नितांत आवश्यकता असतांनाही तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या एकमेव अंजनेरी प्रकल्पातून जवळच असलेल्या वॉटर पार्कसाठी पाणी आरक्षित करण्यात आल्याचा आरोप करत स्थानिक शेतक-यांनी धरणातून पाणी देण्यास तिव्र विरोध दर्शविला आहे.
परिसरातील शेकडो शेतक-यांनी अंजेनेरी येथे बैठक घेत या पाणीवाटपास विरोध दर्शविला आहे. बैठकीत खाजगी व्यवसायास पाणी देण्यास तीव्र विरोध करत हक्काचे पाणी न देण्याचा निर्धार शेतक-यांनी केला. यावेळी ज्येष्ठ नेते मधुकर लांडे, सरपंच राजू बदादे, गोविंद चव्हाण, राजाराम चव्हाण, धोंडीराम चव्हाण, नामदेव चव्हाण, गणेश चव्हाण, चंदू चव्हाण, अंबादास चव्हाण, कचरु निंबेकर, अशोक चव्हाण, गोटीराम करंडे, मुरलीधर महाले, दिलीप शिंदे, निवृत्ती चव्हाण आदी उपस्थित होते. तालुक्यातील पूर्व भागास एकमेव असलेल्या अंजेनेरी धरणावर अनेक गावातील शेतीसह पिण्याचे पाणी अवलंबून आहे. पाच वर्षा पूर्वीच येथील धरणावर शेतक-यांची पाणी सोसायटी सुरु झाली असून त्यानंतर एकाही नवीन शेतक-यांना पाणी उचलण्यासाठी परवानगी दिली जात नसताना खाजगी व्यवसायास १० टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी वापराची परवानगी दिली गेल्याने शेतक-यांनी संताप व्यक्त केला.
रितसर शासनाची परवानगी
अंजेनेरी प्रकल्पातून पिण्यासाठी १५टक्के, औद्योगिकसाठी १० टक्के तर सिंचनासाठी ७५ टक्के पाणी आरक्षित आहे. त्यानुसार, औद्योगिक वापरासाठी असलेल्या आरक्षणातून शुभम वॉटर वर्ल्ड योजनेला ०.००५४७५ दलघमी इतकेच पाणी आरक्षित झालेले आहे आणि ते रितसर शासनाची परवानगी घेऊन झालेले आहे. इतरही योजनांसाठी औद्योगिक आरक्षणातील पाणी मिळू शकते. परंतु, केवळ राजकीय हेतूने वॉटर पार्कसाठीच्या पाण्याला विरोध केला जात आहे. काही शेतक-यांकडून तर सिंचनासाठी पाणी न वापरता नर्सरीला पाणी विक्री केले जात आहे.
- शशिकांत जाधव, संचालक, शुभम वॉटर पार्क

Web Title: Opposition to water the water park from the dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.