गुजरातच्या ‘काथा’साठी महाराष्टÑाच्या वनसंपदेला चुना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 01:16 AM2017-09-25T01:16:44+5:302017-09-25T01:16:50+5:30

नैसर्गिक वनसंपदा लाभलेल्या महाराष्टÑातील आदिवासी क्षेत्राला ग्रहण लागले आहे. नजीकच्या गुजरात राज्यात असलेल्या गुटख्यासाठी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रात थेट शिरकाव करून गुजरातमधील तस्कर खैराच्या वृक्षांची कत्तल करीत आहेत. त्यामुळे ही वनसंपदा धोक्यात आली आहे. विशेष म्हणजे दोन्ही राज्यांतील वनखात्यांना ही चोरटी तूट आणि तस्कारी रोखण्यात अपयश आले आहे.

Opting for Maharashtra's forest resources for 'Kaitha' of Gujarat | गुजरातच्या ‘काथा’साठी महाराष्टÑाच्या वनसंपदेला चुना

गुजरातच्या ‘काथा’साठी महाराष्टÑाच्या वनसंपदेला चुना

Next

अझहर शेख ।
नैसर्गिक वनसंपदा लाभलेल्या महाराष्टÑातील आदिवासी क्षेत्राला ग्रहण लागले आहे. नजीकच्या गुजरात राज्यात असलेल्या गुटख्यासाठी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रात थेट शिरकाव करून गुजरातमधील तस्कर खैराच्या वृक्षांची कत्तल करीत आहेत. त्यामुळे ही वनसंपदा धोक्यात आली आहे. विशेष म्हणजे दोन्ही राज्यांतील वनखात्यांना ही चोरटी तूट आणि तस्कारी रोखण्यात अपयश आले आहे.  गुजरात राज्यातील वापीसह अनेक मोठ्या शहरांच्या औद्योगिक वसाहतींमध्ये गुटखा तयार करण्याचे कारखाने सुरू आहेत. गुटख्यामध्ये लाल रंग येण्यासाठी काथ वापरला जातो; मात्र त्यासाठी खैर लागत असतो. महाराष्टÑात आणि गुजरातच्या सीमेवर असलेल्या नाशिक जिल्ह्णातील पेठ- सुरगाणा या आदिवासी क्षेत्रात पूर्व- पश्चिम वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वनसंपदा असून त्यात खैराचे वृक्षही मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे महाराष्टÑाच्या वन संपत्तीत घुसखोरी करून खैर तस्करांची मोठी टोळी खैराच्या वृक्षांची कत्तल करीत आहे. त्यासाठी तस्कर ‘कटर’ चालवत असल्याचे वृत्त असून, वनविभागाने त्याला दुजोरा दिला आहे. चोरट्यांना अटक करण्यासाठी वनखात्याकडून प्रयत्न केले जात असले तरी गुजरातमधील पोलीस किंवा वनविभागाकडून फारसे सहकार्य मिळत नसल्याचे ‘रॅकेट’च्या मुळाशी पोहचण्यास अडथळे येत असल्याचे सांगण्यात आले.  तस्करांनी अगोदरच सीमेवरील गुजरातमधील खैराची वृक्षसंपदा नष्ट केली आहे आणि आता त्यांची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर पडली आहे. वनविभागापुढे गुजरातच्या खैर तस्करांचे रॅकेट उद्ध्वस्त करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. यासाठी वनविभागाच्या पूर्व व पश्चिमच्या अधिकाºयांनी सुरगाणा, पेठ वनपरिक्षेत्रात स्थानिक गावांचे सरपंच, पोलीस पाटील तसेच पाड्यांवरील संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाºयांच्या मदतीने नागरिकांत जनजागृती सुरू करत जंगलाचे महत्त्व व सुरक्षा पटवून देण्यास प्रारंभ केला आहे. एकीकडे राज्यात पर्यावरण दिनी कोटी कोटी झाडे लावण्याचा विक्रम केला जात असताना दुसरीकडे मात्र, अस्तित्वातील वनसंपदा धोक्यात येत असल्याने वनमंत्र्यांचा उद्देश कितपत सफल होईल, याविषयी शंका निर्माण झाली आहे.
गुजरातशी संबंधित टोळी
गुजरातच्या सीमेवरून महाराष्टÑातील नाशिकच्या सुरगाणा वनपरिक्षेत्राच्या हद्दीत घुसखोरी करून खैरची कत्तल करणाºया तस्कराच्या मुसक्या आवळण्यास वनविभागाच्या गस्त पथकाला  काही दिवसांपूर्वी यश आले. त्यांच्याकडून मिळालेली माहिती  अत्यंत धक्कादायक असून ‘खैर’ तस्करीचे मोठे रॅकेट नाशिक वनविभागाच्या गुजरात सीमेच्या जवळ असलेल्या आदिवासी तालुक्यांच्या वनपरिक्षेत्रात सक्रिय असल्याचे उघड झाले आहे.
सुरगाणा वनक्षेत्रातील वनकर्मचाºयांच्या गस्त पथकाने लाकूड तस्कर टोळीमधील सराईत गुन्हेगार संशयित गणेश मोतीराम वाघमारे (रा. खुंटविहीर, ता. सुरगाणा) यास उंबरपाडा वनउपज नाक्यावर अटक केली. दिंडोरी न्यायालयाने सुनावलेल्या वनकोठडीत वाघमारे याची चौकशी केली असता त्याने साग व खैर वृक्षाची कत्तल करून तस्करीसाठी गुजरातच्या तस्कर टोळीला मदत केल्याचे उघड झाले. एकूणच गुजतरातच्या खैर तस्कर टोळीचे आदिवासी भागात ‘संबंध’ असल्याचे स्पष्ट आहे.

Web Title: Opting for Maharashtra's forest resources for 'Kaitha' of Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.