मौखिक आरोग्य तपासणीत नाशिक जिल्हा प्रथम ३१ पर्यंत मोहीम : ५,१५,३३९ नागरिकांची तापसणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 12:52 AM2017-12-17T00:52:36+5:302017-12-17T00:54:03+5:30
मौखिक आरोग्य तपासणी मोहिमेअंतर्गत नाशिक जिल्ह्णात आतापर्यंत ५ लाख १५ हजार ३३९ नागरिकांची तापसणी करण्यात आली
नाशिक : मौखिक आरोग्य तपासणी मोहिमेअंतर्गत नाशिक जिल्ह्णात आतापर्यंत ५ लाख १५ हजार ३३९ नागरिकांची तापसणी करण्यात आली असून, या मोहिमेत नाशिक जिल्हा प्रथम क्रमांकावर असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी सुशील वाकचौरे यांनी दिली.
डिसेंबर महिन्याच्या पहिल्या दिवसापासून या मोहिमेला सुरुवात झाली असून, ३१ डिसेंबरपर्यंत ही तपासणी मोहीम राज्यभर सुरू राहणार आहे.
नाशित जिल्ह्णात आतापर्यंत विविध तपासणी केंद्रावर ४ लाख ७० हजार ५४२ नागरिकांनी स्वत:हून ही तपासणी करून घेतली असून, सुमारे ४४ हजार ७९७ नागरिकांना आरोग्य विभागाचे कर्मचारी व स्वयंसेवी संस्थांनी या तपासणीचे महत्त्व पटवून देत त्यांची मौखिक तपासणी करवून घेतली आहे.
राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या या मौखिक तपासणी मोहिमेअंतर्गत संपूर्ण राज्यात ३० वर्षांवरील स्त्री व पुरु षांची मौखिक तपासणी केली जात असून, ही तपासणी सर्व शासकीय, महापालिका, नगरपालिका दवाखाने येथे मोफत उपलब्ध आहे. तसेच गाव पातळीवरही तपासणी एएनएम व एमपीडब्लू यांच्यामार्फत करून गरजू लोकांना पुढील उपचारासाठी नजीकच्या दवाखान्यात पाठविण्यात येणार आहे. यामध्ये उपचार हे पूर्णत: निशुल्क असणार आहेत. ही मोहीम यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी इंडियन डेंटल असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन, इंडियन कॅन्सर सोसायटी, लायन्स, रोटरी क्लब तसेच शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयांसारख्या विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यातून राज्यभरात ही मोहीम सुरू आहे.
या मोहिमेदरम्यान संदर्भित झालेल्या रु ग्णांना पुढील सहा महिन्यांच्या आत अंतिम निदान व उपचार करण्यात येणार आहे. या मोहिमेत नागरिकांनी सहभागी होऊन मौखिक तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्यमंत्री डॉ. वाक चौरे यांनी केले आहे.