भारातातील ६४ पैकी वक्तृत्व महत्वाची कला : निलिमा पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 03:51 PM2019-01-21T15:51:22+5:302019-01-21T15:55:14+5:30

वक्तृत्व कलेचे जनक महर्षी व्यास यांनी ज्ञानदानाचे महत्व पटवून दिल्याने आपण ज्ञानदानाच्या जागेस व्यासपीठ असे संबोधतो, कृष्णाने देखील अजुर्नाच्या रथाचे सारथ्य करतांना त्यास आपल्या वक्तृ त्वातून दिशादर्शन केले. वाणी आणि विचारांचे महत्व त्यांनी पटवून दिले,त्यामुळे आपल्या भारतातील ६४ कलांमध्ये वक्तृत्व कलेला महत्वाचे स्थान असल्याचे प्रतिपादन मविप्र संस्थेच्या सरचिटणीस निलीमा पवार यांनी केले. 

Oratory of 64 in Bharatata Artificial Art: Nilima Pawar | भारातातील ६४ पैकी वक्तृत्व महत्वाची कला : निलिमा पवार

भारातातील ६४ पैकी वक्तृत्व महत्वाची कला : निलिमा पवार

googlenewsNext
ठळक मुद्देमविप्र करंडक अखिल भारतीय वक्तृत्व स्पर्धेला प्रारंभदेशभरातून १५० स्पर्धकांचा सहभाग 

नाशिक: वक्तृत्व कलेचे जनक महर्षी व्यास यांनी ज्ञानदानाचे महत्व पटवून दिल्याने आपण ज्ञानदानाच्या जागेस व्यासपीठ असे संबोधतो, कृष्णाने देखील अजुर्नाच्या रथाचे सारथ्य करतांना त्यास आपल्या वक्तृ त्वातून दिशादर्शन केले. वाणी आणि विचारांचे महत्व त्यांनी पटवून दिले,त्यामुळे आपल्या भारतातील ६४ कलांमध्ये वक्तृत्व कलेला महत्वाचे स्थान असल्याचे प्रतिपादन मविप्र संस्थेच्या सरचिटणीस निलीमा पवार यांनी केले. 
रावसाहेब थोरात सभागृहात तेराव्या ‘मविप्र करंडक’ अखिल भारतीय वक्तृृत्व स्पर्धेचे उद्घाटन सोमवारी (दि. २१) झाले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संस्थेचे सभापती माणिकराव बोरस्ते यांच्यासह चिटणीस डॉ.सुनिल ढिकले,संचालक नाना महाले,भाऊसाहेब खातळे, डॉ.प्रशांत देवरे, प्रल्हाद गडाख, सचिन पिंगळे,  प्रा.नानासाहेब दाते, गुलाब भामरे, शिक्षणाधिकारी डॉ.डी.डी.काजळे,डॉ.एन.एस.पाटील,प्रा.एस के.शिंदे,सी.डी.शिंदे आदी उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये वक्त्याला जेवढे महत्व आहे तेवढेच श्रोत्यालाही असल्याचे निलमा पवार यानी नमूद केले. तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व वक्तृृत्व कलेत त्यांचा विकास व्हावा या दृष्टीकोनातून डॉ.वसंत पवार यांनी मविप्र करंडक स्पर्धेती मूहर्तमेढ रोवल्याचे माणिकराव बोरस्ते यांनी अध्यक्षीय मनोगतत व्यक्त करताना सांगितले. प्रास्ताविक स्पर्धाप्रमुख डॉ.डी.पी.पवार यांनी केले. सूत्रसंचलन प्रा.तुषार पाटील यांनी केले.  उपप्राचार्य डॉ.एम.बी.मत्सागर यांनी आभार मानले.

१५० स्पर्धकांचा सहभाग 
मविप्र करंडक वक्तृत्व स्पर्धेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता : नवी दिशा , महात्मा गांधी : जागतिक परिप्रेक्ष्य, चला जलचिंतन करूया, जगावं की मरावं,हाच प्रश्न आहे,  कहते है कि गालिब का अंदाज-ए-बयाँ और है!  हे विषय आहेत. या विषयांवर राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरून स्पर्धेत सहभागी झालेले१५० स्पर्धक आपले विचार व्यक्त करणार आहेत.

Web Title: Oratory of 64 in Bharatata Artificial Art: Nilima Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.