राज्यात ३८ हजार हेक्टरवर फळबाग लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:13 AM2021-05-24T04:13:59+5:302021-05-24T04:13:59+5:30
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची आढावा बैठक शासकीय विश्रामगृह, मालेगाव येथे कृषिमंत्री भुसे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची आढावा बैठक शासकीय विश्रामगृह, मालेगाव येथे कृषिमंत्री भुसे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शेततळे, फळबाग लागवड याविषयी चर्चा करण्यात आली. तालुक्यात कृषी विभागाने सन २०२० मध्ये केवळ १०.६० हेक्टरवर लागवड केल्याची, तर २०२१ मध्ये १३८ शेततळे मंजूर असून केवळ २६ कामांना मंजुरी मिळाल्याची माहिती देण्यात आली. मालेगाव तालुक्यामध्ये या योजनेंतर्गत शेततळे आणि किमान १ हजार हेक्टरवर फळबाग लागवड करण्याच्या सूचना कृषी विभागास देण्यात आल्या. येत्या आठ दिवसात सर्व शेतकऱ्यांचे प्रस्ताव तातडीने मंजूर करावेत. चालू हंगामात शेतकरी बांधवांना शेततळ्याच्या पाण्याचा फायदा होईल या दृष्टीने नियोजन करावे. मागील दोन वर्षापासून डाळिंब लागवडी शेतकऱ्यांना गरज असून त्यानुसार लागवड करण्यात यावी. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गतची कामे करत असताना कृषी विभागास महसूल व ग्रामविकास विभागाने सहकार्य करावे, अशा सूचनाही भुसे यांनी यावेळी दिल्या.
इन्फो
एक हात मदतीचा
मालेगावातील महिला शिक्षकांकडून कोविड रुग्णांसाठी नेब्युलायझर, पल्स ऑक्सिमीटर, स्टिमर, संपर्कासाठी फोन, म्युझिक सिस्टम व इतर आवश्यक साहित्य देण्यात आले. या साहित्याचे भुसे यांच्या हस्ते कोविड सेंटरला हस्तांतर करण्यात आले. प्राथमिक शिक्षिका वैशाली भामरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम हाती घेण्यात आला. समाजसेविका संगीता चव्हाण, नूतन चौधरी, छाया पाटील, ज्योती पाटील, मनीषा सावळे, साधना ब्राह्मणकर, छाया देसले यांनीही पुढाकार घेतला.
फोटो- २३ गगनभरारी
मालेगावातील महिला शिक्षकांकडून कोविड रुग्णांसाठी विविध साहित्य देण्यात आले. त्याप्रसंगी कृषिमंत्री दादा भुसे यांच्यासह वैशाली भामरे, संगीता चव्हाण, नूतन चौधरी, छाया पाटील आदी.
===Photopath===
230521\23nsk_33_23052021_13.jpg
===Caption===
फोटो- २३ गगनभरारीमालेगावातील महिला शिक्षकांकडून कोविड रुग्णांसाठी विविध साहित्य देण्यात आले. त्याप्रसंगी कृषीमंत्री दादा भुसे यांचेसह वैशाली भामरे, संगीता चव्हाण, नूतन चौधरी, छाया पाटील आदी.