वाद्यवृंद कलाकारांचे राज ठाकरेंना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 11:42 PM2020-10-29T23:42:17+5:302020-10-30T01:24:53+5:30
सातपूर :- गेल्या आठ सहा महिन्यांपासून लग्न कार्य आणि समारंभ बंद असल्याने वाद्यवृंद,मंडप,साउंड व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली असून तुलसी विवाहाचे निमित्त साधून परवानगी मिळावी म्हणून वाद्यवृंद असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी कृष्णकुंजवर धाव घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना साकडे घातले आहे.

गेल्या मार्च महिन्यापासून कोरोना महामारीमुळे मंडप,समारंभ हॉल,केटरिंग,फ्लाव्हर्स,डोकोरेशन, आयईडी,स्क्रिन,साउंड आणि लाईट,फोटो ग्राफर,स्वागत ग्रुप,इव्हेंट्स मॅनेजमेंट आणि सर्व वाद्य वृंद कलाकार मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.कर्ज कसे फेडावे या विवंचनेत सापडले आहेत.शासन दरबारी मागणी करुन, निवेदने देऊन काहीही उपयोग झालेला नाही.किमान तुलसी विवाह नंतर लग्न समारंभ सुरु होणार आहेत. त्यानिमित्ताने या व्यावसायिकांना परवानगी द्यावी. त्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सहकार्य करावे म्हणून मनसेचे गटनेते सलीम शेख,जिल्हाध्यक्ष,दिलीप दातीर,शहरअध्यक्ष अंकुश पवार,शहर सचिव अंबादास आहिरे यांच्या नेतृत्वाखाली वाद्यवृंद असोसिएशनचे विनोद दरियानी,सुभाष नाईकवाडे,गणेश मटाले,दाऊद कादरी,कैलास गांगुर्डे आदी पदाधिकाऱ्यांनी कृष्णकुंजवर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.