वारसा हक्क यादीतील ६४ जणांना नियुक्तीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 10:34 PM2020-02-25T22:34:52+5:302020-02-26T00:14:32+5:30
गेल्या काही वर्षांपासून वारसा हक्क यादीतील कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी केली जात होती. महापालिका प्रशासनाने सोमवारी ६४ सफाई कामगारांना कायम सेवेत सामावून घेतले तसे नियुक्तीपत्र दिल्याची माहिती आयुक्त किशोर बोर्डे यांनी दिली.
मालेगाव : गेल्या काही वर्षांपासून वारसा हक्क यादीतील कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी केली जात होती. महापालिका प्रशासनाने सोमवारी ६४ सफाई कामगारांना कायम सेवेत सामावून घेतले तसे नियुक्तीपत्र दिल्याची माहिती आयुक्त किशोर बोर्डे यांनी दिली.
महापालिकेच्या वारस हक्क यादीवर ३०७ जण प्रतीक्षेत आहेत. त्यापैकी ६४ जणांना कायम सेवेत सामावून घेण्यात आले आहे. सफाई कर्मचाऱ्यांची ११० पदे अजूनही रिक्त आहेत. कागदपत्रकांची पूर्तता करून नियमानुसार त्यांनाही नियुक्तीपत्र दिले जाणार आहे. तसेच स्वच्छतेचा प्रश्न निकाली काढण्यासाठी मानधन तत्त्वावर १६ स्वच्छता निरीक्षक, १६ बीट मुकादम, ३२५ सफाई कर्मचारी नियुक्त केले जाणार आहे. सफाई कामगारांच्या नियुक्तीमुळे महापालिकेच्या स्वच्छता विभागात कर्मचाºयांची वाढ होणार आहे.