सर्वेक्षण नसल्याने रखडला कार्यारंभ आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 12:51 AM2018-11-16T00:51:57+5:302018-11-16T00:52:22+5:30
बागलाण तालुक्यातील आराई येथील नळ पाणीपुरवठा योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील कार्यारंभ आदेश देताना विविध बाबींची पूर्तता करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला दिले आहेत.
नाशिक : बागलाण तालुक्यातील आराई येथील नळ पाणीपुरवठा योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील कार्यारंभ आदेश देताना विविध बाबींची पूर्तता करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला दिले आहेत.
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत बागलाण तालुक्यातील आराई येथील पाणीपुरवठा योजनेसाठी निविदा काढण्यात आली होती. यातून एक कोटी ३३ लक्ष रुपयांच्या नळ पाणीपुरवठा योजनेस मंजुरी देण्यात आली आहे.
या योजनेच्या दुसºया टप्प्यातील ९४ लक्ष ९२ हजार रकमेचे कार्यारंभ आदेश ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने मंजुरीसाठी सादर केले होते. मात्र नळ पाणीपुरवठा योजनेसाठीची पाइपलाइन जात असलेल्या जागेच्या मालकांकडून संमतीपत्र घेतले आहे काय? तसेच अंतरासह व सर्व्हे नंबरसह कामाचा नकाशा सादर करण्याचे निर्देश ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला दिले आहेत.