सरकारी कार्यालये तपासणीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 06:50 PM2017-08-03T18:50:41+5:302017-08-03T18:51:25+5:30

order of cheaking government offices | सरकारी कार्यालये तपासणीचे आदेश

सरकारी कार्यालये तपासणीचे आदेश

Next


नाशिक : शहरातील सरकारी-निमसरकारी कार्यालये, महापालिकेच्या मालकीची समाजमंदिरे-व्यायामशाळांच्या इमारती तसेच गृहनिर्माण संस्था-सोसायट्या यांच्या छतांवर पाणी साचून डेंग्यूच्या अळ्यांची उत्पत्ती होत असते शिवाय, संबंधित इमारतींमध्ये अस्वच्छताही असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका होऊ शकतो. त्याची गंभीर दखल घेत संबंधित इमारतींची तातडीने तपासणी आणि दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश महापालिकेच्या आरोग्य समितीच्या पहिल्या बैठकीत सभापती सतीश कुलकर्णी यांनी आरोग्य व वैद्यकीय विभागाला दिले.
आरोग्य व वैद्यकीय सहायक समितीच्या बैठकीत डेंग्यू व जलजन्य आजारांबाबतचा अहवाल मांडण्यात आला. यावेळी डेंग्यूची स्थिती गतवर्षाच्या तुलनेत नियंत्रणात असली तरी सरकारी-निमसरकारी कार्यालये, कमर्शिअल कॉम्प्लेक्स, गृहनिर्माण संस्था, मनपाच्या इमारती यांच्या छतांवर साचणाºया पाण्याचीही तपासणी करण्याचे आदेश सभापतींनी दिले. रुपाली निकुळे यांनी मनपाच्या बºयाच इमारतींना छतावर जाण्यासाठी शिडी अथवा जिन्यांची सुविधाच नसल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावर सभापतींनी बांधकाम विभागाला तातडीने सूचित करत कार्यवाहीचे निर्देश दिले. सभापतींनी सरकारी कार्यालये, व्यावसायिक इमारतींमधील अस्वच्छतेबाबतही चिंता व्यक्त केली. अशा इमारतींची तपासणी करत त्यांना नोटिसा बजावण्याचे आदेशित करण्यात आले. शहरात घरोघरी जाऊन डेंग्यूच्या अळ्या तपासणीसाठी पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याचे अधिकाºयांनी सांगितल्यानंतर त्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना करण्यात आल्या.

Web Title: order of cheaking government offices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.