रेल्वेस्थानकातील कामे पूर्ण करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 01:40 AM2018-10-25T01:40:59+5:302018-10-25T01:41:19+5:30
भुसावळ रेल्वे विभागाचे महाप्रबंधक आर. के. यादव यांनी बुधवारी नाशिकरोड रेल्वेस्थानकात पाहणी करून विविध कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले. तसेच सिन्नरफाटा येथील संरक्षक भिंतीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना केली.
नाशिकरोड : भुसावळ रेल्वे विभागाचे महाप्रबंधक आर. के. यादव यांनी बुधवारी नाशिकरोड रेल्वेस्थानकात पाहणी करून विविध कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले. तसेच सिन्नरफाटा येथील संरक्षक भिंतीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना केली. भुसावळ रेल्वे विभागाचे महाप्रबंधक आर.के. यादव व इतर विविध विभागाचे अधिकारी यांनी बुधवारी दुपारी प्लॅटफॉर्म एकवरील वेटिंग रूम, खाद्य पदार्थांचे स्टॉल्स, स्थानक परिसर आणि रेल्वे रूळातील स्वच्छता, पिण्याचे पाणी आदींची पाहणी केली. तसेच प्लॅटफॉर्म क्रमांक २, ३ व ४ ची पाहणी करून स्वच्छता, मार्गदर्शक फलकाबाबत सूचना केल्या. यावेळी काही प्रवाशांशीदेखील यादव यांनी संवाद साधला. कुंभमेळ्यात चौथा प्लॅटफार्म बांधण्यात आला असून सिन्नरफाटा, स्टेशनवाडी भागातून रेल्वेस्थानकात अनधिकृत फेरीवाले आदी प्रवेश करतात. त्यामुळे प्रवासी आणि रेल्वेच्या सुरक्षिततेबाबत अडचण निर्माण होत आहे. सिन्नर फाटा भागात रेल्वे प्रशासनाकडून आठ फूट उंचीची संरक्षक भिंत बांधण्यात येत आहे. भिंत बांधण्यास स्थानिक रहिवाशांनी विरोध दर्शविला आहे; मात्र प्रवासी, रेल्वेच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे सुरक्षा दलाची मदत घेऊन संरक्षक भिंतीचे काम त्वरित पूर्ण करण्याचे आदेश यादव यांनी दिले. यावेळी वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक सुनीलकुमार मिश्रा, मंडल वाणिज्य निरीक्षक जीवन चौधरी, स्टेशन प्रबंधक आर. के. कुठार, मुख्य वाणिज्य अधिकारी कुंदन महापात्रा, अभियंता विद्युत एस. जी. सय्यद, वरिष्ठ मंडल अभियंता अनिलकुमार सिंग, विद्युत अभियंता प्रवीण पाटील, टेलिकम्युनिकेशनचे चव्हाण, सय्यद, रेल्वे सुरक्षा दलाचे दुय्यम पोलीस निरीक्षक बी.एस.झगडे, मुख्य पार्सल पर्यवेक्षक के. व्ही. अखिलकर, तिकीट बुकिंग प्रमुख एम. पी. डोके, मुख्य तिकीट तपासणीस आर. के. जैन, ए. ए. पटेल आदी उपस्थित होते.
संरक्षक भिंतीचे काम पूर्ण करण्याच्या सूचना
नाशिकरोड रेल्वे स्थानकात पाहणी करून विविध कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले. तसेच सिन्नरफाटा येथील संरक्षक भिंतीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना केली. प्लॅटफॉर्म एकवरील वेटिंग रूम, खाद्य पदार्थांचे स्टॉल्स, स्थानक परिसर आणि रेल्वे रूळातील स्वच्छता, पिण्याचे पाणी आदींची पाहणी केली. तसेच विविध विभागप्रमुखांशी समस्यांबाबत चर्चा केली.