जिल्हाधिकाºयांना आदेश : अपात्र उमेदवारांचे म्हणणे मान्य बहुचर्चित पोलीसपाटील भरतीसाठी फेरमुलाखत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 01:21 AM2018-01-05T01:21:48+5:302018-01-05T01:22:47+5:30

नाशिक : दीड वर्षापूर्वी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आलेल्या पोलीसपाटील व कोतवाल भरतीतील अनियमिततेविरुद्ध उच्च न्यायालय व मॅटकडे धाव घेतलेल्या अपात्र उमेदवारांचे म्हणणे अखेर मान्य करून मॅटने अन्याय झालेल्या उमेदवारांची फेरमुलाखत घेण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांना दिले आहेत.

Order to District Collector: Recognizing ineligible candidates for recruitment of well-known police force | जिल्हाधिकाºयांना आदेश : अपात्र उमेदवारांचे म्हणणे मान्य बहुचर्चित पोलीसपाटील भरतीसाठी फेरमुलाखत

जिल्हाधिकाºयांना आदेश : अपात्र उमेदवारांचे म्हणणे मान्य बहुचर्चित पोलीसपाटील भरतीसाठी फेरमुलाखत

googlenewsNext
ठळक मुद्देदहा गुण तोंडी मुलाखतीसाठी देण्याचे धोरण सुमारे दीड वर्ष पाठपुरावा

नाशिक : दीड वर्षापूर्वी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आलेल्या पोलीसपाटील व कोतवाल भरतीतील अनियमिततेविरुद्ध उच्च न्यायालय व मॅटकडे धाव घेतलेल्या अपात्र उमेदवारांचे म्हणणे अखेर मान्य करून मॅटने अन्याय झालेल्या उमेदवारांची फेरमुलाखत घेण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांना दिले आहेत. त्यानुसार सोमवार, दि. ८ जानेवारी रोजी संबंधिताना कागदपत्रांसह उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील जवळपास सर्व तालुक्यांतील शेकडो रिक्त असलेले पोलीसपाटील व कोतवालांची भरती करण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकाºयांनी ८० गुणांची लेखी परीक्षा घेण्याचे व दहा गुण कागदपत्रांना व दहा गुण तोंडी मुलाखतीसाठी देण्याचे धोरण निश्चित केले होते व त्या त्या उप विभागीय अधिकाºयांना या भरतीचे प्रमुख म्हणून नेमण्यात येऊन ही भरतीप्रक्रिया राबविण्यात आली होती.
सुमारे दीड वर्ष पाठपुरावा केल्यानंतर मॅटने अन्याय झालेल्या उमेदवाराच्या बाजूने आपला कौल दिला असून, सिन्नर तालुक्यातील नळवाडी येथील श्रीमती आशा शहाणे, प्रतिभा शहाणे व मीना दराडे या तिघा उमेदवारांना सोमवार, दि. ८ जानेवारी रोजी निफाड उप विभागीय कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना प्रांत अधिकारी महेश पाटील यांनी दिल्या आहेत. उमेदवारांनी येताना सर्व कागदपत्रे सोबत आणण्याचेही बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्ये या भरतीविषयी उमेदवारांच्या फारशा तक्रारी नसल्या तरी, निफाड व सिन्नर या दोन तालुक्यांत मात्र मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप उमेदवारांनी केला होता व तशी तक्रार त्यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली होती. जिल्हाधिकाºयांनी या भरतीची चौकशीही करून अन्याय झालेल्या उमेदवारांची फेर मुलाखत घेण्याच्या सूचना दिल्या होत्या, तथापि, तत्पूर्वीच उमेदवारांनी मॅट तसेच उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Web Title: Order to District Collector: Recognizing ineligible candidates for recruitment of well-known police force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :examपरीक्षा