कोविडचा रुग्ण लपवल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:10 AM2021-04-29T04:10:56+5:302021-04-29T04:10:56+5:30

सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे कोरोना विषाणूचा प्रादुर्भावासंदर्भात त्यांनी महसूल, आरोग्य व ग्रामपंचायत प्रशासनाचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी ...

Order to file charges if Kovid hides patient | कोविडचा रुग्ण लपवल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेश

कोविडचा रुग्ण लपवल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Next

सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे कोरोना विषाणूचा प्रादुर्भावासंदर्भात त्यांनी महसूल, आरोग्य व ग्रामपंचायत प्रशासनाचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना केल्या. आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या अभियानाची माहिती दररोजच्या दररोज प्राथमिक आरोग्य केंद्राला दिली पाहिजे. तालुक्यातील खासगी डॉक्टर यांची यादी तयार करून संबंधित डॉक्टर यांना कोविड लक्षणे असलेल्या रुग्णांची माहिती आरोग्य विभागाला देण्याबाबत तहसीलदार कोताडे यांना सूचना करण्यात आल्या. गावपातळीवर प्रत्येकाला जबाबदारी वाटून द्यावी. यामध्ये प्रामुख्याने ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी पुढाकार घेतला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले. दोडी ग्रामीण रुग्णालयात तसेच स्थानिक आरोग्य केंद्रात कर्मचारी संख्या वाढविणे गरजेचे असून उपकेंद्रावर औषधी उपलब्ध करून देण्याची मागणी सभापती शोभा बर्के यांनी उपआयुक्त गाडीलकर यांच्याकडे केली. यावेळी याप्रसंगी उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड, तहसीलदार राहुल कोताडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, सहायक पोलीस उपनिरीक्षक सागर कोते, पंचायत समितीच्या सभापती शोभा बर्के, जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, सरपंच गोपाल शेळके, उपसरपंच रामदास सानप, दीपक बर्के, ग्रामविकास अधिकारी एन. बी. हासे आदी उपस्थित होते.

फोटो - २८ सिन्नर मिटींग

सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे कोरोना जनजागृतीसंदर्भात महसूल उपआयुक्त गोरक्षनाथ गाडीलकर यांनी आढावा घेतला. त्याप्रसंगी उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड, राहुल कोताडे, मोहन बच्छाव, सागर कोते, नीलेश केदार, गोपाल शेळके, रामदास सानप, दीपक बर्के आदी.

===Photopath===

280421\28nsk_10_28042021_13.jpg

===Caption===

फोटो - २८ सिन्नर मिटींग सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे कोरोना जनजागृती संदर्भात महसूल उप आयुक्त गोरक्षनाथ गाडिलकर यांनी आढावा घेतला. त्याप्रसंगी उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड, राहुल कोताडे, मोहन बच्छाव, सागर कोते, निलेश केदार, गोपाल शेळके, रामदास सानप, दीपक बर्के आदी.

Web Title: Order to file charges if Kovid hides patient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.