फिनिक्स इन्फ्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश

By admin | Published: September 30, 2015 12:07 AM2015-09-30T00:07:56+5:302015-09-30T00:10:10+5:30

नागपूरस्थित कंपनी : प्लॉटच्या नावाखाली फसवणूक

Order to file a complaint against Phoenix Infra | फिनिक्स इन्फ्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश

फिनिक्स इन्फ्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश

Next

नाशिक : प्लॉटच्या नावाखाली गुंतवणूकदारांकडून लाखो रुपयांची गुंतवणूक करून घेऊन प्लॉट वा रक्कम परत न करता फसवूणक करणाऱ्या नागपूरच्या फिनिक्स इन्फ्रा इस्टेट इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा न्यायालयाने दिले आहेत़ पोलिसांकडे वारंवार तक्रार देऊनही दुर्लक्ष केल्याने तक्रारदारांनी न्यायालयाकडे वैयक्तिक फौजदारी खटला दाखल केला होता़
सिडको येथील अमित सावरगावकर, बेबी सोनवणे, गोदावरी लद्दड, अंजना देवस्थळी यांनी नागपूर येथील फिनिक्स इन्फ्रा इस्टेट इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीच्या देवपूर, सिन्नर व नाशिकच्या आॅर्चिड पार्क येथे प्लॉट घेण्यासाठी गुंतवणूक केली होती़ कंपनीने एका प्लॉटसाठी दोन लाख ५६ हजार ७२१ रुपये प्रत्येक गुंतवणूकदारांकडून जमा केले होते़ यानंतर कंपनीने गुंतवणूकदारांबरोबर साठेखत करारनामाही केला, मात्र खरेदी देण्यास टाळाटाळ करीत होती़
कंपनीचे गोविंदनगरमधील कार्यालयाने गुंतवणूकदारांना खरेदी देऊ शकत नाही, असे सांगत १०० टक्के नफा ग्राह्य धरून चार लाख ४२ हजार रुपये देण्याचे मान्य करून स्टेट बँक आॅफ इंडियाचे धनादेश दिले, मात्र ते वटलेच नाहीत़ यानंतर कंपनीने नाशिकचे कार्यालय बंद केले तसेच कंपनीने मौजे देवपूर येथील गट नंबर ११७० / २ या मिळकतीचा व्यवहार केलेला असला तरी ती मिळकतच कंपनीच्या नावावरच नसल्याचे आढळून आले़ तसेच कंपनीचे संचालक प्रदीप राठोड व अधिकारी जितेश नशिने, अहमद जीवानी, मोतीलाल तुकाराम बांडेबुचे, विजय गौतम, चंद्रशेखर देशभ्रतार यांच्यावर मध्य प्रदेशातील इंदौर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
तक्रारदार अमित सावरगावकर यांनी या फसवणुकीची लेखी तक्रार अंबड पोलीस ठाणे तसेच पोलीस आयुक्तांकडे केली होती़ मात्र या तक्रारीची दखल न घेतल्याने गुंतवणूकदारांनी अ‍ॅड़ राहुल पाटील यांच्यामार्फत जिल्हा न्यायालयात वैयक्तिक फौजदारी खटला दाखल केला होता़ त्यामध्ये न्यायाधीश ढवळे यांनी २३ सप्टेंबर २०१५ रोजी फिनिक्स इन्फ्रा कंपनीच्या अधिकाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश अंबड पोलिसांना दिले आहेत़ (प्रतिनिधी)

Web Title: Order to file a complaint against Phoenix Infra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.