नांदगाव तालुक्याला पाणी देण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 12:52 AM2017-11-27T00:52:06+5:302017-11-27T00:52:37+5:30

भविष्यात होणाºया नार पार - दमणगंगा नदीजोड प्रकल्पाचे महाराष्ट्राला मिळणाºया पाण्यातून नांदगाव तालूक्याला पाणी देण्याचे आदेश केद्रींय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी संबधीतांना दिले असल्याची माहिती समाधान पाटील यांनी दीली.

 Order to give water to Nandgaon taluka | नांदगाव तालुक्याला पाणी देण्याचे आदेश

नांदगाव तालुक्याला पाणी देण्याचे आदेश

Next

नांदगाव : भविष्यात होणाºया नार पार - दमणगंगा नदीजोड प्रकल्पाचे महाराष्ट्राला मिळणाºया पाण्यातून नांदगाव तालूक्याला पाणी देण्याचे आदेश केद्रींय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी संबधीतांना दिले असल्याची माहिती समाधान पाटील यांनी दीली. नांदगाव तालूक्याच्या पाणीप्रश्नावर समाधान पाटील आणि डॉ. प्रभाकर पवार यांनी नितीन गडकरी यांची नागपूर येथे भेट घेऊन नांदगाव तालूक्याच्या भीषण दूष्काळाचे वास्तव समोर ठेवले.  नांदगाव तालूका हा सर्वात कमी पर्जन्यमान असलेला तालूका असल्याने बाहेरचे पाणी आणल्याशिवाय पर्याय नाही ही बाब लक्षात आणून देत  नारपार-दमणगंगेचे पश्चिमी वाहीनी नद्यांचे पाणी नांदगाव तालूक्यासाठी आरक्षीत करावे. असे झाल्यास तालूक्यातील सूमारे ७० ते ७५ गांवाना वरदान ठरु शकते. याची दखल घेत नितीन गडकरी यांनी नांदगावचा या प्रकल्पात समावेश व्हावा म्हणून संबधीतांना तात्काळ निर्देश दिले.  तालूक्याच्या दृष्टीने ही आजवरची सर्वात महत्वाची बाब ठरली. तसेच तालूक्यात मध्यम प्रकल्प व लघूप्रकल्पाच्या माध्यमातून फक्त १.५ टी.एम.सी पाणी साठवण क्षमता आसल्याचे निदर्शनास आणून देत साठवण क्षमता वाढवीण्याच्या दृष्टीकोणातुन दहेगाव व मांडवडवाडी धरणाची उंची वाढविणे व शांकाबरी नदीवर मांडवडवाडी धरणाच्या खाली, मांडवड गावाजवळ, पाटखाना व साकोरा शिवार येथे बँरेजेस बांधणे मन्याड नदीवर डॉक्टरवाडी जवळ काळडोह,बाभूळवाडी ग्रांमपंचायत विहीरजवळ ,चांदोरा रस्त्याजवळ,साकोरा मानमोड्या ,न्यायडोंगरी ग्रां.प विहीरीजवळ बँरेजेस बांधणे,पांझण नदीवर ,न्यू पांझण शिवार, साकोरा शिवार व जामदरी शिवार येथे बँरेजेस बांधणे असे पर्याय सूचिवल्यानंतर यालाही स्वतंत्र निधी देण्याच्या दृष्टीने केद्रीय जलसंपदा विभागाला निर्देश दिले असल्याचे समाधान पाटील व डॉ.प्रभाकर पवार यांनी सांगितले.  फोटो तीन केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांचेशी संवाद साधताना समाधान पाटील व डॉ. प्रभाकर पवार. 
गोदावरी व तापी खोºयाच्या पाण्याने मराठवाडा, अहमदनगर , जळगाव , नाशिक जिल्हा समृध्द झाला. चारही बाजूने पाणी फिरविण्यात आले परंतू नांदगाव तालूक्याला एक थेंब पाणी गेल्या ४० वर्षात मिळाले नाही.

Web Title:  Order to give water to Nandgaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.