हरणबारी कालव्याच्या सर्वेक्षणाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 06:24 PM2018-12-06T18:24:06+5:302018-12-06T18:24:24+5:30

बागलाण तालुक्यातील केळझर चारी क्र मांक आठ साठी राज्य शासनाने अंतिम प्रशासकीय मान्यता प्रदान करत ४ कोटी ९७ लाख रु पयांचा निधी उपलब्ध करून दिलेला असतानाच केळझर वाढीव चारी क्र मांक आठ सह प्रलंबित हरणबारी उजव्या कालव्याच्या सर्वेक्षणाचे आदेश जलसिंचन विभागाने दिल्याची माहिती धुळ्याचे खासदार तथा संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी दिल्याने दोन्ही कालव्यांच्या लाभक्षेत्रातील शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

Order of Hernan Canal survey | हरणबारी कालव्याच्या सर्वेक्षणाचे आदेश

हरणबारी कालव्याच्या सर्वेक्षणाचे आदेश

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांना दिलासा : अवर्षणप्रवण बागलाणपूर्वला होणार फायदा

सटाणा : बागलाण तालुक्यातील केळझर चारी क्र मांक आठ साठी राज्य शासनाने अंतिम प्रशासकीय मान्यता प्रदान करत ४ कोटी ९७ लाख रु पयांचा निधी उपलब्ध करून दिलेला असतानाच केळझर वाढीव चारी क्र मांक आठ सह प्रलंबित हरणबारी उजव्या कालव्याच्या सर्वेक्षणाचे आदेश जलसिंचन विभागाने दिल्याची माहिती धुळ्याचे खासदार तथा संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी दिल्याने दोन्ही कालव्यांच्या लाभक्षेत्रातील शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
केळझर चारी क्र मांक आठ च्या शून्य ते बारा किलोमीटर पर्यंत (भाक्षी-मूळाने पर्यंत) चा मार्ग यापूर्वीच मोकळा झालेला असतांना आता त्यापुढील चौगाव,कर्हे,अजमिर सौंदाणे, सुराणे, देवळाणे येथील सर्वेक्षणाला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातून मंजुरी मिळाली असून या वाढीव कालव्यासाठी १४ दलघफु पाणी आरक्षण करण्यासाठी आपण किटबध्द असल्याचे डॉ. भामरे यांनी म्हटले आहे.शासनाने मापदंडात बसत नसल्याचा शेरा मारलेल्या बागलाण तालुक्यातील बहुचर्चित हरणबारी उजव्या कालव्यासाठी पूरपाण्याव्यतिरिक्त ३८ दलघफू पाणीसाठा जलसंपदा विभागाने आरक्षित केला असून हरणबारी उजव्या कालव्याचे सर्वेक्षण करण्याचे आदेश जलसंपदा विभागाने सबंधित अधिकाºयांना दिल्याने पारनेर, बिजोटे, आखतवाडे, गोराणे, आनंदपूर, फोफिर, खीरमाणे, कोटबेल, कुपखेडा, नामपूर परिसर, नळकेस,सारदे, रामतीर, रातीर, सुराणे, देवळाणे, वायगा, काकडगाव,द्याने,आसखेडा,सातमाणे गावांच्या शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.
केळझर वाढीव चारी क्र मांक आठ आणि हरणबारी उजव्या कालव्याचे सर्वेक्षण करण्याचे लेखी आदेश जलसंपदा विभागाने बुधवारी दिले. दोन्ही कालव्यांच्या सर्वेक्षणासाठी कमी कालावधीच्या निविदा प्रसिध्द करून लाभक्षेत्रातील एकही गाव टळणार नाही याची पुरेपूर दक्षता घेतली जाणार असल्याचे डॉ.सुभाष भामरे म्हटले आहे.केळझर वाढीव चारी
क्र मांक आठच्या माध्यमातून मुळाणे येथील स्मशानभूमीलगतच्या धरणात पाणी टाकण्याचे देखील नियोजन करण्यात येणार असून लवकरच दोन्ही प्रलंबित कालव्यांच्या कामाला सुरु वात करणार असल्याची ग्वाही डॉ.भामरे यांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान भामरे यांनी सिंचन प्रकल्प प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन बागलाण वासियांना दिलेले होते. हरणबारी उजव्या कालव्यामुळे वर्षानुवर्षे दुष्काळाच्या झळा सोसणार्या बागलाण तालुक्यातील पारनेर, बिजोटे, आखतवाडे, आसखेडा ,गोराणे, आनंदपूर, द्याने ,फोफिर, खीरमाणी, कोटबेल, कुपखेडा,नामपूरपरिसर, नळकेस,सारदे,काकडगाव ,रामतीर, रातीर, सुराणे, देवळाणे, वायगाव, सातमाणे गावांच्या पिण्याच्या पाण्यासह शेतीसिंचनाचा प्रश्न मिटणार आहे तर चारी क्र मांक आठ च्या शून्य किलोमीटर पासून बारा किलोमीटर पर्यंत (भाक्षी-मूळाने पर्यंत) चा मार्ग आता मोकळा झालेला असताना आता त्यापुढील चौगाव,कºहे,अजमिर सौंदाणे, सुराणे, देवळाणे येथील वाढीव चारी क्र मांक आठ च्या सर्वेक्षणाचे लेखी आदेश निघाल्याने पुढील मार्ग सुखकर झाला आहे.
-----------------------------
केळझर चारी क्र मांक आठ साठी यापूर्वीच शासनाने मंजूर केलेल्या ४ कोटी ९७ लाखांच्या निधीतून केळझर चारी क्र मांक आठ च्या कान्हेरी नदीवरील पाईपलाईनसाठी ८२ लाख रु पयांचा निधी राखीव ठेवण्यात आल्याचे देखील डॉ.भामरे यांनी स्पष्ट करत केळझर वाढीव चारी क्र मांक आठ च्या सर्वेक्षणाचे आदेश जलसंपदा विभागाने काढल्याने लाभक्षेत्रातील शेतकर्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.केळझर चारी क्र मांक आठ चा प्रश्न गत पंचवीस वर्षांपासून प्रलंबित होता.हा कालवा शासकीय मापदंडात बसत नसल्याचा शेरा तत्कालीन शासनाने मारला होता तसेच या कालव्याचे सर्वेक्षण एका शेतकºयांच्या शेतातून व प्रत्यक्ष कालवा दुसर्याच शेतातून असे चुकीचे सर्वेक्षण यापूर्वी करण्यात आले होते मात्र यातून आम्ही मार्ग काढून सतत पाठपुरावा करून गत अनेक वर्षांपासूनची शेतकर्यांची केळझर चारी क्र मांक आठ चे काम सुरु करण्याची मागणी पूर्ण केली असून आता केळझर वाढीव चारी क्र मांक आठ सह हरणबारी उजव्या कालव्याच्या सर्वेक्षणाचे आदेश निघाल्याने शेतकºयांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी सदैव कटिबध्द असल्याचे डॉ.भामरे यांनी सांगितले.

Web Title: Order of Hernan Canal survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.