औषध खरेदी निविदेच्या चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 09:55 PM2019-11-28T21:55:13+5:302019-11-28T21:55:38+5:30

मालेगाव : महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून औषध खरेदीत टाळाटाळ केली जात आहे. या औषध खरेदी निविदाप्रक्रियेची चौकशी करावी, अशी सूचना स्थायी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

Order for inquiry into drug purchase tender | औषध खरेदी निविदेच्या चौकशीचे आदेश

औषध खरेदी निविदेच्या चौकशीचे आदेश

Next
ठळक मुद्देआरोग्य विभागाकडून औषध खरेदीत टाळाटाळ

लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून औषध खरेदीत टाळाटाळ केली जात आहे. या औषध खरेदी निविदाप्रक्रियेची चौकशी करावी, अशी सूचना स्थायी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
स्थायी समिती सभापती डॉ. खालीद परवेझ यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी स्थायीची सभा झाली. या सभेच्या प्रारंभी आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभारावर टीका करण्यात आली, तर स्थायी समितीला विश्वासात न घेता महत्त्वाचे रस्ते दुरुस्ती करण्याचा विषय तहकूब करण्यात आला. यासह तीन विषय तहकूब करण्यात आले, तर बयाणा रक्कम व परत करण्याच्या दोन विषयांना मंजुरी देण्यात आली.

Web Title: Order for inquiry into drug purchase tender

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.