निधी कर्जखात्यात वर्ग न करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 11:12 PM2019-02-28T23:12:30+5:302019-02-28T23:14:28+5:30

नाशिक : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत प्राप्त निधी हा लाभार्थ्यांच्या नावाने बँकेत जमा झाल्यानंतर काही बॅँकांकडून सदरची रक्कम कर्ज खात्यात परस्पर वर्ग करून घेतली जात असल्याच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता सदर योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणारी रक्कम कोणत्याही प्रकारच्या कर्ज खात्यामध्ये वर्ग न करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

Order not to be classed in the fund loan account | निधी कर्जखात्यात वर्ग न करण्याचे आदेश

निधी कर्जखात्यात वर्ग न करण्याचे आदेश

Next
ठळक मुद्देकिसान सन्मान : बॅँकांंना पत्र; वन कायद्यांतर्गत शेतकरीही योजनेस पात्र

नाशिक : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत प्राप्त निधी हा लाभार्थ्यांच्या नावाने बँकेत जमा झाल्यानंतर काही बॅँकांकडून सदरची रक्कम कर्ज खात्यात परस्पर वर्ग करून घेतली जात असल्याच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता सदर योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणारी रक्कम कोणत्याही प्रकारच्या कर्ज खात्यामध्ये वर्ग न करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या संदर्भातील परिपत्रक अग्रणी बँकेने सर्व शाखांकडे पाठविले असून, अशा प्रकारची तक्रार असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्कालीन कक्षाकडे तक्रार करण्याचे आवाहनही केले आहे.
काही शेतकऱ्यांची रक्कम कर्ज खात्यामध्ये वर्ग करण्याबाबतचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर अग्रणी बँकेकडे याबाबत प्रशासनाने विचारणा केली असता बँकांना अशा कोणत्याही सूचना देण्यात आल्या नसल्याचे बँकेचे व्यवस्थापक बर्वे यांनी सांगितले. त्यानंतर संबंधित शाखा व्यवस्थापकांशी संपर्क साधून सदर रक्कम संबंधित शेतकºयांना देण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. अशा सूचना जिल्ह्णातील सर्व बँकांना देण्यात आल्या आहेत. 
वनकायद्यांतर्गत वनपट्ट्यांचे वाटप करण्यात आलेले, परंतु नाव सातबारा सदरी नसलेले वनपट्टाधारक शेतकरीदेखील योजनेस पात्र आहेत. याबाबतच्या सूचना तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत. ज्यांना अद्याप वनपट्ट्यांचे वाटप झाले नाही अशांनाही वन पट्ट्यांचे वाटप झाल्यावर या योजनेचा लाभ देण्यात येईल. योजनेबाबत काही तक्रार असल्यास शेतकºयांनी ०२५३-२३१५१७५ किंवा २३१५०८० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे.काही शेतकºयांच्या नावातील तांत्रिक चुकांमुळे बँकेत जमा केलेली रक्कम एनआयसीमार्फत परत काढण्याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर आवश्यक दुरुस्त्या करून लाभार्थी एकच असल्याबाबत खात्री संबंधित शेतकºयाच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्याबाबत अहवाल पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकºयांच्या खात्यातून परत गेलेली रक्कम परत जमा करण्यात येणार आहे, असे स्पष्टीकरणही देण्यात आले आहे.

Web Title: Order not to be classed in the fund loan account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी