दोन कोटी अदा करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 12:20 AM2018-04-13T00:20:25+5:302018-04-13T00:20:25+5:30

सटाणा : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विभाजनानंतर ताळेबंदा-नुसार सटाणा बाजार समितीने नामपूर बाजार समितीस दोन कोटी रुपये अदा करावेत, असे आदेश विभागीय निबंधक मिलिंद भालेराव यांनी दिले.

Order to pay 2 crores | दोन कोटी अदा करण्याचे आदेश

दोन कोटी अदा करण्याचे आदेश

Next
ठळक मुद्देनामपूर : विभागीय निबंधकांचे आदेशनामपूर बाजार समितीच्या संचालक मंडळाने पणन संचालकांकडे धाव घेतली.

सटाणा : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विभाजनानंतर ताळेबंदा-नुसार सटाणा बाजार समितीने नामपूर बाजार समितीस दोन कोटी रुपये अदा करावेत, असे आदेश विभागीय निबंधक मिलिंद भालेराव यांनी दिले.
सटाणा बाजार समितीचे विभाजन होऊन नामपूर येथे स्वतंत्र समितीची स्थापना झाली. अधिसूचनेनुसार ६० पैकी ३२ पदे सटाणा बाजार समितीकडे तर २८ नामपूरकडे वर्ग झाली. ५ आॅक्टोबरला जिल्हा विशेष लेखापरीक्षक सी.वाय. पिंगळे यांनी लेखापरीक्षण करून २ कोटी ४ लाख २५ हजार ५६४ रुपये सटाणा बाजार समिती प्रशासनाने नामपूर समितीला अदा करावेत, असा अहवाल दिला. सटाणा बाजार समितीने प्रतिसाद दिला नाही. माजी सभापती भाऊसाहेब कापडणीस, संचालक डॉ. दिकपाल गिरासे, गोपाळ गायकवाड, किरण देवरे, सचिव संतोष गायकवाड यांनी पाठपुरावा केला. त्यानंतर समितीने दोन्ही बाजार समितीच्या मुख्य प्रशासक व सचिव यांचे म्हणणे ऐकून अहवाल उपनिबंधकांकडे सादर केला. त्यानुसार दोन कोटी रु पये अदा करण्याचे आदेश देण्यात आले आहे.२० जुलै २०१६ला शासन नियुक्त संचालक मंडळ अस्तित्वात आले. त्यानंतर नामपूर बाजार समितीची अडकलेली दोन कोटी रुपयांची रक्कम मिळविण्यासाठी लढाई सुरू झाली. जिल्हा निबंधकांकडे तक्र ार केल्यानंतर नामपूर बाजार समितीच्या संचालक मंडळाने पणन संचालकांकडे धाव घेतली.

Web Title: Order to pay 2 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.