जागा मोकळी करण्याचे पोलिसांना आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 11:54 PM2018-01-11T23:54:03+5:302018-01-12T01:36:03+5:30
नाशिक : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पोलीस आयुक्तालयाकडून मुख्यालयाच्या जागेचा ताबा पोलीस प्रशासनाने कागदोपत्री जिल्हा न्यायालयाला दिला; मात्र सदर अडीच एकर जागेत अद्यापही पोलिसांचे साहित्य, पत्र्याचे शेड असल्यामुळे जागेचा वापर जिल्हा न्यायालयाला करणे शक्य होत नसल्याने उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयाने गुरुवारी (दि.११) सदर जागा २१ जानेवावरीपर्यंत पूर्णपणे मोकळी करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला दिले आहे.
नाशिक : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पोलीस आयुक्तालयाकडून मुख्यालयाच्या जागेचा ताबा पोलीस प्रशासनाने कागदोपत्री जिल्हा न्यायालयाला दिला; मात्र सदर अडीच एकर जागेत अद्यापही पोलिसांचे साहित्य, पत्र्याचे शेड असल्यामुळे जागेचा वापर जिल्हा न्यायालयाला करणे शक्य होत नसल्याने उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयाने गुरुवारी (दि.११) सदर जागा २१ जानेवावरीपर्यंत पूर्णपणे मोकळी करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला दिले आहे. जिल्हा न्यायालयाला लागून असलेल्या पोलीस मुख्यालयाची जागा न्यायालयाला मिळावी, यासाठी मागील पंधरा वर्षांपासून नाशिक बार असोसिएशनचे प्रयत्न सुरू होते. २०१३ साली महाराष्टÑ-गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्षांनी याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी होऊन उच्च न्यायालयाने सदर जागेचा ताबा पोलीस प्रशासनाने न्यायालयाला द्यावा, असा निकाल दिला होता. यानंतर पोलीस आयुक्तांनी कागदोपत्री जागेचा ताबा न्यायालयाला सोपविला. मात्र सदर जागेवरील पत्र्याचे शेड व पोलीस मुख्यालयाचे साहित्य, दारूगोळा ठेवण्याचे आगार अद्याप प्रशासनाकडून हटविण्यात आलेले नाही.