मागणी : छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेडचे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन आधार लिंक होईपर्यंत नियमित धान्यपुरवठा करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 01:11 AM2018-04-09T01:11:38+5:302018-04-09T01:11:38+5:30

नाशिक : जिल्ह्यात आतापर्यंत आधार लिंकिंगचे केवळ ५५ टक्के काम पूर्ण झालेले आहे. असे असतानाही अन्न व नागरी पुरवठा विभागाने लाभार्थ्यांच्या अंगठ्याचा ठसा ई-पॉस यंत्रावर उमटल्याशिवाय आधारलिंक शिधापत्रिकाधारकांनाही धान्य न देण्याचा निर्णय घेतला आहे.

Order: Provide regular food grains to the Chhatrapati Shivaji Muslim Brigade's District Supply Officer, till the support link. | मागणी : छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेडचे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन आधार लिंक होईपर्यंत नियमित धान्यपुरवठा करावा

मागणी : छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेडचे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन आधार लिंक होईपर्यंत नियमित धान्यपुरवठा करावा

Next
ठळक मुद्दे३० जूनपर्यंत आधार लिंकिंगसाठी मुदतवाढ आधार नोंदणीचे काम अपूर्ण

नाशिक : जिल्ह्यात आतापर्यंत आधार लिंकिंगचे केवळ ५५ टक्के काम पूर्ण झालेले आहे. असे असतानाही अन्न व नागरी पुरवठा विभागाने लाभार्थ्यांच्या अंगठ्याचा ठसा ई-पॉस यंत्रावर उमटल्याशिवाय आधारलिंक शिधापत्रिकाधारकांनाही धान्य न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यूआयडीने ३० जूनपर्यंत आधार लिंकिंगसाठी मुदतवाढ दिली असताना ही सक्ती कशासाठी, असा सवाल छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेडतर्फे जिल्हापुरवठा अधिकाºयांना देण्यात आलेल्या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. काही शिधापत्रिकाधारकांचे आधार क्र मांक संलग्न असले तरी त्यांचे अंगठे ई-पॉस यंत्रावर जुळत नसल्याने अशा शिधापत्रिकाधारकांना धान्य दिले जात होते व त्यासाठी त्यांना धान्य दिल्याची पावती दिली जात होती. मात्र आता सर्वच शिधापत्रिकाधारकांचे आधार क्र मांक पुरवठा खात्याशी संलग्न करण्यात आल्यामुळे एईपीडीएस प्रणालीचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे आधार नोंदणीचे काम अपूर्ण असून, पॉस मशीनमधील त्रुटी दुरुस्त न करता सर्वसामान्य लाभार्थींची कुचंबणा करून ही प्रणाली रेटून नेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप संघटनेने निवेदनाच्या माध्यमातून केला आहे. तसेच शंभर टक्के आधार सिडिंग पूर्ण होईपर्यंत बायोमेट्रिकची सक्ती न करता पावतीद्वारे धान्य देण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली. यावेळी अजिज पठाण, स्वप्निल इंगळे, माधुरी भदाणे, मुख्तार शेख, इब्राहीम अत्तार, निसार खाटीक आदी उपस्थित होते.

Web Title: Order: Provide regular food grains to the Chhatrapati Shivaji Muslim Brigade's District Supply Officer, till the support link.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.