नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 05:41 PM2018-11-21T17:41:49+5:302018-11-21T17:42:03+5:30
वणी : दिंडोरी तालुक्यात सोमवारी झालेल्या अवकाळी पावसाने सुमारे १२७ हेक्टर क्षेत्र बाधीत झाले आहे. त्यांचे पंचनामे करण्याचे आदेश अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
वणी : दिंडोरी तालुक्यात सोमवारी झालेल्या अवकाळी पावसाने सुमारे १२७ हेक्टर क्षेत्र बाधीत झाले आहे. त्यांचे पंचनामे करण्याचे आदेश अधिकाऱ्यांनी दिले आहेत. प्रामुख्याने सर्वाधिक नुकसान द्राक्ष बागांचे झाले असून खतवड येथील सोमनाथ मुळाणे यांचा सुमारे चार एकर ऊस भुईसपाट झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी वारे व गारपीट झाल्याने परिसरात द्राक्ष मणांना तडे गेले असून, द्राक्षबागांवर विपरीत परिणाम जाणवू लागले आहेत. बुरशीजन्यरोग व कुज होवू नये यासाठी महागडी औषधे फवारणी करण्यात शेतकरी व्यस्त दिसत आहे. पडझड झालेला ऊस संबधित साखर कारखान्याने तात्काळ गाळपासाठी तोड करावी अशी मागणी केली जात आहे. वरखेडा, सोनजांब, आंबे वणी, घोडेवाडी, बोपेगाव, खतवड, आंबे दिंडोरी, शिवनई, जानोरी, वरवंडी आदी गावांचा समावेश आहे. द्राक्ष - ७८ हेक्टर,टोमॅटो २४ हेक्टर, कांदा -९ हेक्टर भाजीपाला ,फुलं आदी पिकांचा समावेश असून, १२७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. सर्वाधिक पाऊस वरखेडा मंडळात झाला.
वरखेझ- २२ मि.लि.मीटर , मोहाडी -४ ,दिंडोरी -१ असा एकूण २७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे . नुकसानग्रस्त भागाचा प्रांताधिकारी उदय किसवे, तहसीलदार बाबासाहेब गाढवे, नायब तहसीलदार आबासाहेब तांबे, तालुका कृषी अधिकारी अभिजित जमदाडे यांनी पाहणी दौरा करून पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे.