ध्येय गाठण्यासाठी अभ्यासात सातत्य हवे : विश्वास नांगरे पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 02:24 PM2020-01-06T14:24:11+5:302020-01-06T14:24:18+5:30

लासलगाव : कठोर परिश्रम आणि उच्चत्तम ध्येय गाठण्यासाठी विधायक दृष्टीकोनातुन अभ्यासातील सातत्य याच्या सहाय्याने यशाची शिखरे गाठणे मुळीच अवघड नाही . त्यासाठी महाविद्यालयात शिक्षणात मौजमजेपेक्षा जीवनाला आयाम देण्याचे महत्त्वाचे केंद्रबिंदू मानुन शिक्षणात जिद्दीने आघाडी घ्यावी असे आवाहन नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी केले.

 In order to reach the goal, consistency in the study is needed: Biswas Nangare Patil | ध्येय गाठण्यासाठी अभ्यासात सातत्य हवे : विश्वास नांगरे पाटील

ध्येय गाठण्यासाठी अभ्यासात सातत्य हवे : विश्वास नांगरे पाटील

googlenewsNext

लासलगाव : कठोर परिश्रम आणि उच्चत्तम ध्येय गाठण्यासाठी विधायक दृष्टीकोनातुन अभ्यासातील सातत्य याच्या सहाय्याने यशाची शिखरे गाठणे मुळीच अवघड नाही . त्यासाठी महाविद्यालयात शिक्षणात मौजमजेपेक्षा जीवनाला आयाम देण्याचे महत्त्वाचे केंद्रबिंदू मानुन शिक्षणात जिद्दीने आघाडी घ्यावी असे आवाहन नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी केले.
लासलगाव येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून पाटील बोलत होते. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष संजय होळकर, जनरल
सेक्र ेटरी गोविंदराव होळकर, सदस्य चंद्रशेखर होळकर, हसमुख पटेल, बी वाय होळकर, खजिनदार अनिल डागा, चंद्रशेखर भावसार ,प्राचार्य डॉ दिनेश नाईक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विश्वास नांगरे-पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आपण समाजाचं देणं लागतो ही भावना मनाशी बाळगा असे सांगतानाच आपण स्वत: उपाशी राहून दुसर्याला खाऊ घालणं ही आपली महाराष्ट्राची संस्कृती असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
प्रारंभी े प्राचार्य डॉ दिनेश नाईक यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा.अश्विनी पवार यांनी केले. आभार प्रा. किशोर गोसावी यांनी मानले.

Web Title:  In order to reach the goal, consistency in the study is needed: Biswas Nangare Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक