विद्यार्थी सवलत पास ची रक्कम परत करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 04:46 PM2020-04-10T16:46:47+5:302020-04-10T16:47:28+5:30

सिन्नर : २० मार्च नंतर शालेय विद्यार्थ्यांनी काढलेल्या सवलतीच्या प्रवासी पासची रक्कम एस. टी. महामंडळाने परत करावी अशी मागणी तालुक्यातील विद्यार्थ्यांनी केली आहे.

Order to refund student discount pass amount | विद्यार्थी सवलत पास ची रक्कम परत करण्याची मागणी

विद्यार्थी सवलत पास ची रक्कम परत करण्याची मागणी

googlenewsNext
ठळक मुद्दे संचारबंदीचे दिवस वजा करून पुढील पासमध्ये दिवस वाढवून द्यावेत अशी मागणी

सिन्नर : २० मार्च नंतर शालेय विद्यार्थ्यांनी काढलेल्या सवलतीच्या प्रवासी पासची रक्कम एस. टी. महामंडळाने परत करावी अशी मागणी तालुक्यातील विद्यार्थ्यांनी केली आहे.
मार्च महिन्याच्या सुरु वातीपासून ‘कोरोना’ संसर्गजन्य आजाराने भारतात प्रवेश केला. नंतर तो संपूर्ण फैलावत असल्याने सरकारने संपुर्ण देशात संचारबंदी लागू करु न शाळा-महाविद्यालयांना सुट्टी दिली आहे. मात्र, त्यापूर्वीच फेब्रुवारी-मार्चमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा व शालेय अभ्यासक्र म सुरू असल्याने हजारो विद्यार्थ्यांनी मार्च महिन्याचे सवलतीचे पास एस. टी मंडळाकडून घेतले होते.
मात्र, शाळा, महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांना घरीच थांबावे लागले. त्यामूळे हे पास त्यांना वापरता आलेले नाहीत. संचारबंदीमूळे एस. टी. बस सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली असून अनेक विद्यार्थ्यांनी रु पये खर्च करून सवलतीचे पास न वापरता पडून आहेत.
अनेक विद्यार्थी एम. एस. सी. आय. टी. सह अनेक कोर्सेससाठी सिन्नरला येतात. त्यांनीही एस. टी. चे पासेस काढलेले होते. त्याशिवाय अनेक नोकरदारांनी २० दिवसांचे पैसे भरु न पास घेतले आहेत. परंतु सर्वांना घरात रहाणे सक्तीचे झाल्याने हे पास वापरता आलेले नाहीत. परिणामी वापरात न आलेल्या पासची रक्कम विद्यार्थ्यांसह नोकरनदारांना परत करावी अशी मागणी तालुक्यातील विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. एस. टी. महामंडळाने यापूवी घेतलेल्या पासच्या रकमेचा एकतर परतावा द्यावा अथवा पुढील पास काढताना संचारबंदीचे दिवस वजा करून पुढील पासमध्ये दिवस वाढवून द्यावेत अशी मागणी केली आहे.

Web Title: Order to refund student discount pass amount

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.