जायकवाडीसाठी नगर- नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्याचे आदेश
By संजय पाठक | Published: October 30, 2023 05:28 PM2023-10-30T17:28:07+5:302023-10-30T17:31:23+5:30
पंतप्रधानांची पाठ फिरताच घेतला निर्णय, गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शिर्डी दौरा असल्याने त्यावेळी आंदेालने टाळण्यासाठी कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता
नाशिक- यंदा अपुरा पाऊस झाल्याने नाशिककर चिंताक्रांत असतानाच नाशिक जिल्ह्यातील गंगापूर आणि दारणा धरण समुहातून मराठवाड्यातील जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे नाशिककरांची चिंता वाढली आहे. यामुळे पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी राज्यात बहुतांश ठिकाणी अपुरा पाऊस झाला. नाशिक जिल्ह्यात तर सरासरीच्या ६७.८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. त्यातल्या त्यात धरणे भरली असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असला तरी खरीप पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पुढील पावसाळ्यापर्यंत चारा आणि अन्य समस्या निर्माण होणार आहेत. अशा स्थिस्तीत मराठवाड्यासाठी पाणी सोडण्याच्या हालचाली सुरू होणारच होत्या. गेल्या १७ आक्टोबरला छत्रपती संभाजी नगर येथे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाची बैठक पार
पडली त्यात केवळ धरणांतील साठ्याची आकडेवारी सादर करण्यात आली होती.
दरम्यान, गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शिर्डी दौरा असल्याने त्यावेळी आंदेालने टाळण्यासाठी कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता मात्र आता यासंदर्भात आदेश जारी करण्यात आला आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण समुहातून ०.५ टीएमसी, दारणा समुहातून २ हजार ६४३ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्यामुळे हा विषय पेटण्याची
शक्यता आहे.