कोरोना नियंत्रणासाठी यंत्रणांना कारवाईचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:27 AM2021-02-18T04:27:28+5:302021-02-18T04:27:28+5:30

नाशिक: जिल्ह्यात कोरेानाच्या रूग्ण संख्येत काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसत असल्याने प्रशासनाकडून सुरक्षिततेबाबत खबरदारी घेतली जात आहे. त्या अनुषंगाने ...

Orders of action to systems for corona control | कोरोना नियंत्रणासाठी यंत्रणांना कारवाईचे आदेश

कोरोना नियंत्रणासाठी यंत्रणांना कारवाईचे आदेश

Next

नाशिक: जिल्ह्यात कोरेानाच्या रूग्ण संख्येत काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसत असल्याने प्रशासनाकडून सुरक्षिततेबाबत खबरदारी घेतली जात आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी संबधित यंत्रणांना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले असून त्या सभा,समारंभ तसेच लग्न सोहळ्याला शंभर पेक्षा जास्त उपस्थिती असल्यास कारवाई केली जाणार आहे.

कोरोना विषाणुचा प्रार्दुभाव राेखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने काेरोना नियंत्रणासाठी अनेक नियम व अटी घालण्यात आल्या असून नियमांच्या अधीन राहून जिल्ह्यात ‘मिशन बिगेन अगेन’ सुरू करण्यात आलेले आहे. मात्र नियमांतून सूट दिल्यासारखे नाशिककर सर्वत्र गर्दी करू लागले आहेत. मास्कही बाजुला सारला जात असून डिस्टन्स नियमांचे उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे. बाजारपेठेतील गर्दी वाढतच असल्याने त्यामुळे देखील केारेाना संसर्गाचा धोका वाढेलेला आहे. नागरिकांमध्ये आलेल्या बिफीकीरीमु केारोनाचे रूग्ण पुन्हा आढळून येत असल्याने नाशिककरांनी आताच सावधगिरी बाळगावी यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहे.

राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये केरोनोच्या रूग्ण संख्येत वाढ होत असल्याचे समेार आले आहे. नाशिकलाही हा धोका असल्यामुळे कोरेाना प्रतिबंधात्मक उपायोजनेच्ाय अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व सक्षम यंत्रणांना आदेश दिले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस तसेच महापालिका प्रशासनाने कठोर कारवाई करासी असे आदेश देण्यात आले आहेत. लग्न सोहळ्यांना मर्यादेपेक्षा जास्त उपस्थिती आढळल्यास कारवार्स केली जाणार आहे. या शिबाय संबंधितांना आगोदर रितसर पोलीसांची परवानगी घ्यावी लागणार आहे. विनापरवाना गर्दी जमविल्यास त्यांना पोलीसी कारवाईला देखील सामोरे जावे लागेल.

डिस्टन्स नियम तसेच मास्क वापराबाबत नियमांचे उल्लंघन होतांना दिसल्यास महापालिकेने कारवाई करावी अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. कन्टन्मेंट क्षेत्रासाठी लागू असलेल्या निर्बंधांचे पालन करण्यासाठीचे देखील आदेश देण्यात आलेले आहेत.

--इन्फो--

‘प्रतिबंधात्मक क्षेत्र’ फलक दिसू लागले

कारोनाचा प्रभाव कमी होत असल्यामुळे इमारतींच्या प्रवेशद्वारावर दिसणारे ‘प्रतिबंधात्मक क्षेत्र’ फलक आता पुन्हा दिसू लागले आहेत. जेथे रूग्ण आढळून येतील त्यांच्या संपर्कातील सर्वांची तपासणी केली जाणार आहे.

Web Title: Orders of action to systems for corona control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.