अपघाती मृत्यूनंतर अवयवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 03:05 PM2020-08-18T15:05:30+5:302020-08-18T15:06:10+5:30

सिन्नर: गतवर्षी जनता विदयालय पांढुर्ली येथील इयत्ता ६ वी मध्ये शिकणारी कु.तेजश्री शेळके या विद्यार्थ्यांनीचा शालेय आवारात खेळताना अपघात झाला आणि उपचाराअंती तिचा दुर्दैवाने मृत्यु झाला हे दुःख शेळके कुटुंबियांनी पचवत आपल्या मुलगी तेजश्रीचे सर्व अवयव नाशिक येथील हाँस्पीटलला दान करून नवीन आदर्श उभा केला.

Organ donation after accidental death | अपघाती मृत्यूनंतर अवयवदान

अपघाती मृत्यूनंतर अवयवदान

Next
ठळक मुद्देपांढुर्ली: तेजश्री शेळके कुटूंबियांचे दातृत्व

सिन्नर: गतवर्षी जनता विदयालय पांढुर्ली येथील इयत्ता ६ वी मध्ये शिकणारी कु.तेजश्री शेळके या विद्यार्थ्यांनीचा शालेय आवारात खेळताना अपघात झाला आणि उपचाराअंती तिचा दुर्दैवाने मृत्यु झाला हे दुःख शेळके कुटुंबियांनी पचवत आपल्या मुलगी तेजश्रीचे सर्व अवयव नाशिक येथील हाँस्पीटलला दान करून नवीन आदर्श उभा केला.
यानंतर सदर कुटुंबीयांना आर्थिक मदत व्हावी म्हणून केंद्रप्रमुख कैलास शेळके मुख्याध्यापक वैशाली उकिर्डे ,शिक्षक संघाचे राज्य कार्याध्यक्ष श्री .अंबादास वाजे ,तालुकाध्यक्ष .संजय भोर , गोरक्ष सोनवणे यांनी तात्काळ सहकार्य करून राजीव गांधी अपघात विमा योजना प्रस्ताव पंचायत समिती शिक्षण विभागाला सादर केला
यानंतर गटविकासाधिकारी लता गायकवाड , गटशिक्षणाधिकारी .मंजुषा साळुंखे ,विस्तारअधिकारी राजीव लहामगे ,वरिष्ठ सहाय्यक रंजन थोरमिसे यांनी प्रस्तावावर योग्य कार्यवाही करत राज्यशासनास मंजुरीसाठी पाठवला त्यांचे फलित म्हणून दिनांक १७ आँगस्ट रोजी सदर विद्यार्थ्यांनीला ७५ हजार रूपये अपघाती विमा मंजुर झाला सदर विमा रकमेचा चेक आजच्या मासिक सभेत सिन्नर पंचायत समितीच्या सभापती शोभाताई बर्के ,उपसभापती संग्राम कातकाडे व सदस्य श्री.तातु जगताप,रवी पगार,वेनुताई डावरे ,संगिता पावसे , कांगणे ,गटविकासाधिकारी लता गायकवाड , सहाय्यक गटविकासाधिकारी प्रल्हाद बिब्बे यांच्या हस्ते शेळके कुटुंबीच्या वतीने मुलीच्या आईकडे म्हणजेच ज्योती शेळके यांना देण्यात आला
तसेच यावेळी गटशिक्षणाधिकारी मंजुषा साळूंके यांनी उपस्थित पदाधिकारी यांना मा.मु.का.अ.यांच्या डोनेट फाँर डिव्हाईस या जिल्हा उपक्रमाचे महत्त्व सांगून डोनेट डिव्हाईस चे आवाहन करून आवाहन पञिकेचे वाटप केले.

Web Title: Organ donation after accidental death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.