अवयवदान करणाऱ्यांचा होणार सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:12 AM2021-01-17T04:12:58+5:302021-01-17T04:12:58+5:30
विधि आयोग अहवालानुसार अपघातात मृत्यू होणाऱ्या अनेक व्यक्तींना वेळेत उपचार मिळाल्यास अपघाती मृत्यू पावणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत घट होईल. ...
विधि आयोग अहवालानुसार अपघातात मृत्यू होणाऱ्या अनेक व्यक्तींना वेळेत उपचार मिळाल्यास अपघाती मृत्यू पावणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत घट होईल. अपघातग्रस्त व्यक्तींना वेळीच मदत मिळावी, यासाठी जानेवारी, २० ते ३१ डिसेंबर, २०२० कालावधीत अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या जीवनदूत व्यक्तींचा आणि अवयवदान महत्त्व जाणून ज्यांनी अवयवदान केले आहे, अशांचा किंवा त्यांच्या कुटुंबीयांचा रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालय गौरव करणार आहे. यासाठी संबंधितांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय खटला विभागात अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, छायाचित्र मोबाइल नंबर मदत केल्याचा दिनांक, वेळ, ठिकाण माहिती, अपघातग्रस्त व्यक्तींचा संपर्क क्रमांक (असल्यास) पोलीस आरोग्य विभागाने दिलेले प्रशस्तिपत्रक (असल्यास) सरकारी, अन्य कागदपत्रे अवयवदान केल्याचा पुरावा आदी तपशिलासह ३० जानेवारीपर्यंत अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
इन्फो===
दरवर्षी अपघातात मृत्यू पावणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. अपघातात जखमी झालेल्यांना तत्काळ उपचार मिळावेत, तसेच अवयवदानामुळे एखाद्याला आजारी व्यक्तीला अवयवदान करणाऱ्या व्यक्तीचा अवयव जोडल्यास पुन्हा जीवन जगणे सुरळीत होऊ शकते, म्हणून अवयवदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रबोधनाचा हा भाग आहे.
- भरत कळसकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी