सेंद्रिय शेती काळाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2021 09:11 PM2021-02-03T21:11:23+5:302021-02-04T00:05:19+5:30
लासलगाव : निमगाव वाकडा येथील रेणुकानगरातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात जागतिक कृषी महोत्सवाची सांगता पालखी सोहळ्याने झाली. शेतीमध्ये रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा अतिरेक वापर केल्याने आज अनेक जीवघेणे आजार वाढले आहेत. सेंद्रिय शेती करून शेतीला विषमुक्त करून मानवजातीला रोगमुक्त करूया, असे आवाहन निफाड केंद्राचे याज्ञिकी प्रतिनिधी सुभाष खाटेकर यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाची सुरुवात श्री स्वामी समर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन पं. स. सदस्य रंजना पाटील व शेतकरी निवृत्ती गायकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. यावेळी सेंद्रिय शेती, बालसंस्कार, विवाह संस्कार, सणवार व्रतवैकल्ये, ज्ञानदान अशा विविध विषयांवर पिंपळगाव केंद्राचे प्रतिनिधी मांढरे, भगीरथ शिंदे, प्रमिला सपकाळे, माजी प्राचार्य विश्वनाथ व्यवहारे यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळाच्या संचालक निता पाटील, लता दरेकर, निमगाव वाकड्याचे सरपंच मधुकर गायकर , ग्रामपंचायत सदस्य उज्ज्वला गायकर, शोभा गायकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्र प्रतिनिधी श्रावण जाधव, प्रतीक सूर्यवंशी, मगन पेदे, टर्ले, मुकुंद गायकर, अक्षय जाधव, सुमित न्याहारकर, कृष्णा जाधव, प्रमोद गिते आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती गायकर यांनी केले. (०२ लासलगाव)