नाशकात पालापाचोळ्यावर प्रक्रियेसाठी सेंद्रीय खत प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 02:32 PM2018-03-14T14:32:46+5:302018-03-14T14:32:46+5:30

Organic fertilizer project for the cultivation of saplings in Nashik | नाशकात पालापाचोळ्यावर प्रक्रियेसाठी सेंद्रीय खत प्रकल्प

नाशकात पालापाचोळ्यावर प्रक्रियेसाठी सेंद्रीय खत प्रकल्प

Next
ठळक मुद्देरुपाली निकुळे यांनी जेतवननगर व इंदिरानगर येथे प्रायोगिक तत्वावर सेंद्रिय खत प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव ठेवला होता

नाशिक - शहरात ठिकठिकाणी पालापाचोळा उचलला जात नसल्याबद्दल महापालिकेच्या आरोग्य समितीच्या सभेत नाराजी व्यक्त करण्यात आली. यावेळी, पालापाचोळा खतप्रकल्पावर न टाकता त्याच्यावर प्रक्रिया करण्यासाठी सेंद्रीय खत प्रकल्पाची उभारणी करण्याची आणि त्यासाठी विभागनिहाय सर्वेक्षण करण्याची सूचना सभापती सतिश कुलकर्णी यांनी आरोग्य विभागाला दिली.
आरोग्य व वैद्यकीय सहाय्य समितीच्या सभेत, रुपाली निकुळे यांनी जेतवननगर व इंदिरानगर येथे प्रायोगिक तत्वावर सेंद्रिय खत प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव ठेवला होता. यावेळी, सभापती सतिश कुलकर्णी यांनी सांगितले, पालापाचोळा उचलण्यासाठी प्रभागांमध्ये गाडी उपलब्ध करून दिली जात नाही. प्रामुख्याने, उपनगरांमध्ये पालापाचोळा पडून राहण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे पालापाचोळा थेट खतप्रकल्पावर वाहून नेण्याऐवजी विभागात एका ठिकाणी तो जमा करुन त्यापासून सेंद्रीय खत प्रकल्पाची उभारणी करता येऊ शकेल. त्यानुसार, विभागनिहाय जागांची पाहणी करण्याची सूचनाही कुलकर्णी यांनी केली. शहरात अनेक प्रभागांमध्ये नाल्यांचा प्रश्न गंभीर आहे. दुर्गंधीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असल्याबद्दल सभापतींनी ड्रेनेज विभागाला जाब विचारला. यावेळी ड्रेनेज विभागाचे खातेप्रमुख उपस्थित नसल्याबद्दल सभापतींनी नाराजी व्यक्त केली. येत्या १५ दिवसात त्याबाबतचा सर्वे करून कार्यवाही करण्याचे आदेशही त्यांनी दिले. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील एक्सरे मशिन गेल्या दीड वर्षांपासून बंद असल्याबद्दल वैद्यकीय अधिक्षकांना विचारणा करण्यात आली.त्यावर डॉ. राजेंद्र भंडारी यांनी बिटको आणि कथडा हॉस्पिटलमध्ये डिजीटल एक्सरे मशिन बसविण्याचे काम सुरू असल्याची माहिती दिली. यावेळी, डेंग्यूच्या रुग्णसंख्येची माहिती घेण्यात आली. डेंग्यू नियंत्रणाबाबत संबंधितांना नोटीसा बजावण्याची कार्यवाही सुरू असून आतापर्यंत ५८९ नागरिकांना नोटीसा दिल्याची माहिती डॉ. राहुल गायकवाड यांनी दिली.

Web Title: Organic fertilizer project for the cultivation of saplings in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.